- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

सेलूत महाशिवराञ महोत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम.  

समशेर खान
प्रतिनिधी.(सेलू ) येथील ग्रामदैवत श्री शंकरलिंग मंदिर संस्थान येथे शनिवार दि. 03 फेब्रु. ते 10 फेब्रुवारी 2018 या कालावधीत महाशिवराञ महोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताह, परम रहस्य पारायण, प्रवचन, शोभायात्रा, श्रीं ची पालखीमिरवणुक, शिवपाठ,रूद्राभिषेक,गाथा भजन, शिव जागर, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.                  आठवडाभर चालणारया या अखंड शिवनाम सप्ताहांत शि.भ.प.शिवसांब विलासआप्पा किडे, अमोल महाराज बनवसकर, बालाजी पाटील येरोळकर,मन्मथआप्पा खके ,बबनआप्पा गाडवे, सोनबा शिराळे गुरूजी, सौ. शकुंतलाताई चाकोते यांची शिवकिर्तने, श्री गुरू शंभुलिंग शिवाचार्य महाराज,शिवाप्पा खके गुरूजी, श्री हरिश्चंद्रआप्पा साडेगावकर, सौ. महानंदाताई खके, श्री गुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, श्री गुरू अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांची प्रवचने, दि.9/2/18 रोजी शि.भ.प.ओंकार स्वामी यांचे टाळ आरती किर्तन, दि. 10/2/18 ला शिवानंद महाराज दाबशेडकर यांचे प्रासादीक कीर्तन व त्यानंतर श्री गुरू अमृतेश्वर महाराज यांचे आशिर्वचन होणार आहे.मंगळवार दि. 13 रोजी महाशिवराञी निमित्त श्रींचा रूद्रभिषेक श्री बबनआप्पा झमकडे व नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितित महाआरती,बुधवार  दि. 14 रोजी श्रींची पालखी मिरवणुक व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. श्री रूगले परिवार, विठ्ठल कालवणे, प्रभाकर मिटकरी, भगवान चौरे,रामदास पाटील, निजलिंग तरवडगे,सदाशिव क्षिरसागर, शंकर राऊत,शिवकुमार नावाडे यांचे दैनिक अन्नदान होणार आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमात सर्व शिवभक्तांनी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष शिवकुमार नावाडे, सचिव निजलिंगआप्पा तरवडगे, रामदास पाटील, विश्वनाथ हुगे,  राधेशाम लोया,गणेश गोरे, महेश महाजन, चंद्रशेखर रूगले, विनोद भगत, संभाप्पा विर ,प्रकाश साखरे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें