शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुलींनी मारली स्पर्धेत बाजी*
*सेलू*
*दि.२५/२/२०१८*
रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंती निमित्त येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
येथील श्रीराम काॅलनी मधील एकलव्य विद्यालयात दि. २५ फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे,प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूद सर, सानेगुरुजी कथामालेच्या अध्यक्षा कल्पनाताई हेलसकर,अनिल रत्नपारखी, सल्लागार योगेश ढवारे, पत्रकार डाॅ.विलास मोरे,प्रा.महेश कुलकर्णी,राम गायकवाड,रामप्रसाद बोराडे,गुलाबराव गायकवाड,तुकाराम मगर,किशोर भांडवले, परीक्षक ज्येष्ठ साहित्यिक सुर्यवंशी सर,मंगेश गोरे,प्राचार्य चित्रलेखा शेरे,रमेश दौड,संयोजक सतीश जाधव,आयोजक सुनील गायकवाड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनानंतर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.
या वक्तृत्व स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले होते.
●पहिला गट- इयत्ता ५ वी ते ७ वी या गटासाठी विषय पुढीलप्रमाणे ठेवण्यात आले होते
१.मराठी भाषेचे महत्त्व
२.माझी शाळा स्वच्छ शाळा
●दुसरा गट- इयत्ता ८ वी ते १० वी गटासाठी विषय
१.माझ्या स्वप्नातील भारत
२.स्त्री शिक्षण काळाची गरज
हे असून वेळ इयत्ता ५ वी ते ७ वी साठी ५ मिनिटे तर इयत्ता ८ वी ते १० वी साठी ७ मिनिटे ठेवण्यात आला होता. यात लहान गटातून १८ स्पर्धक तर मोठ्या गटातून २३स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यात मुलींचा सहभाग लक्षणीय होता आणि त्याहूनही अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे यशस्वी सर्व क्रमांक मुलींनीच पटकावले.कधी टाळ्यांचा कडकडाट तर कधी डोळ्याच्या कडा ओलावणारा प्रसंग याने संपूर्ण आसमंतात नवचैतन्य आणले.
बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
गटनिहाय यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे
●इयत्ता ५ वी ते ७ वी (लहान गट)
१.नांदापूरकर मधूरा योगेंद्र - नूतन कन्या प्रशाला सेलू
२.कुलकर्णी मनाली मंगेश - श्री. के.बा विद्यालय सेलू
३. चव्हाण प्रगती- नूतन कन्या प्रशाला सेलू
उत्तेजनार्थ- लाड नंदिनी डिगांबर- के.जी.बि.व्ही सेलू
●इयत्ता ८ वी ते १० वी ( मोठा गट)
१.गायकवाड प्रियंका लक्ष्मण- के.जी.बि.व्ही सेलू
२.गांजापूरकर देवहुति भालचंद्र - नूतन कन्या प्रशाला सेलू
३.कर्हाळे अदिती गोविंद - यशवंत विद्यालय सेलू
उत्तेजनार्थ - खापरे सारिका राजेभाऊ - के.जी.बि.व्ही सेलू
या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले ते बाल व्याख्यानकार समिक्षा साबणे हिचे शिवाजी महाराज यांच्यावरील व्याख्यान व बालशाहीर अतिश घोगरे यांचा महाराजावरील पोवाडा यांचे अप्रतिम सादरीकरण.शिवाजी महाराजांचा सजीव देखावा संतोष जाधव याने साकारला होता.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन योगेश ढवारे यांनी तर आभार माधव गव्हाणे यांनी मानले.
जवळपास ४ तास चाललेल्या या कार्यक्रमास सेलूनगरीतील शिक्षक,विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक,महिला यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विजय चौधरी,मंगेश कुलकर्णी, किर्ती राऊत,सर्जेराव सोळंके,रामेश्वर शिसोदे,पदमपल्ले,कांबळे सर आदी शिक्षकवृंदांनी अथक परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें