व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा सम्पन्न - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 फ़रवरी 2018

व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा सम्पन्न

व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा सम्पन्न

सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील  कै. रमेश वरपुडकर  महाविद्यालयातंर्गत गुणवत्ता वाढ विभाग व ग्लोबल टॅलेंट ट्रॅक प्रा. लि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटक ह. शि. प्र. मं.च्या उपाध्यक्षा सौ. ज्योतीताई कदम तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. वसंत सातपुते हे होते. तर मार्क मार्टिन हे या कार्यशाळेचे साधनव्यक्ती व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या कार्यशाळेत मार्क मार्टिन यांनी पाहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना मुलखात देण्याच्या विविध पद्धती, गट चर्चा करण्याच्या पद्धती व फायदे,  वैयक्तीक माहीतीसाठी रिज्युम कसा बनवावा याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दुसऱ्या सत्रात मार्टिन यांनी ग्रूप डिस्कशन व मुलाखतीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यासमवेत दाखवले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील एकूण सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी मदत होईल आणि भविष्यातही अशा कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयातंर्गत गुणवत्ता वाढ विभागातर्फे  करण्यात येईल असे प्रा.डॉ. पाटील यांनी समारोप प्रसंगी बोलतांना सांगितले. प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अंतर्गत गुणवत्ता वाढ विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील यांनी केले तर आभार प्रा.डॉ. संतोष रणखांब यांनी मानले.

1 टिप्पणी: