*सोनपेठ ग्रंथवाचन चळवळी च्यावतीने मराठी राजभाषा दिन साजरा*
*पाल्यांना ईंग्रजी शिकवा परंतू मायबोलीचा विसर पडु देऊ नका-प्रा.डॉ.सा.द.सोनसळे*
सोनपेठ(राजेश खेडकर) येथील ग्रंथ वाचन चळवळीच्या वतीने मंगळवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक सभागृह येथे कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन व मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लब सोनपेठचे अध्यक्ष बालमुकूंद सारडा हे होते तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.डॉ.सा.द.सोनसळे हे उपस्थीत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.शेख मोहम्मद जहिरोद्दिन, शेख अफरोज अब्दुल हन्नान, समीयोद्दीन काझी, नागनाथ सातभाई, सौ.कन्याकुमारी आरावत, सौ.साधना काळे, सौ.अनुराधा परळकर हे उपस्थीत होते.
यावेळी ग्रंथ वाचन चळवळी च्यावतीने येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सा.द.सोनसळे यांची स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापिठाच्या मराठी अभ्यास मंडळावर सदस्यपदी निवड झाल्याबद्द चळवळीच्यावतीने शॉल, श्रीफळ व संत तुकोबारायांची अभंग गाथा भेट देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला ऊत्तर देतांना प्रा.डॉ.सोनसळे यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्य निर्मितीवर विचार मांडले. मराठी भाषा ही प्राचीन भाषा असुन या भषेची गोडी आजही अविट आहे असे मत व्यक्त केले.
यात कार्यक्रमात श्री मुक्तेश्वर विद्यालयास कार्यक्रमाचे औचित्य साधुन ग्रंथदान करण्यात आले. या प्रसंगी शिवमल्हार वाघे, बालमुकूंद सारडा यांनी मराठी भाषेचे महत्व आपल्या भाषणातून विषद केले. तर आंगनवाडीत शिकनाऱ्या चि.गौरव गादेकर या चिमुरड्याने मराठी भाषीक कविता सादर केली. कार्यक्रमाचे सुत्र संचलन सह शिक्षक संदीप लष्करे व प्रस्ताविक ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी केले तर आभार बाबासाहेब गर्जे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राधेश्याम वर्मा, शिवाजी कुंभारीकर, कन्हैयालाल वर्मा, दामाजी प्रधाने, गणेश खेडकर आदीनीं परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें