औषधी वनस्पती प्रदर्शनाचे आयोजन
परिसरातील वनस्पतींची ओळख होण्यासाठी प्रदर्शनाचा नागरीकांनी लाभ घ्यावा-प्रा.डॉ.पाटील
सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातर्फे दि. १४ फेब्रूवारी बुधवार रोजी औषधी वनस्पतीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात परिसरातील विविध औषधी वनस्पतींची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असतात, त्याची माहीती व परिसरातील लोकांना वापर करण्याचा पद्धतीची माहीती होण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे असे विभाग प्रमुख प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील यांनी सांगीतले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सकाळी १० ते २ या कालावधीत या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते व प्रा.डॉ.पाटील यांनी केले आहे.

very nice sir ji.
जवाब देंहटाएं