मला आमदाराची खुर्ची तुमच्यामुळे मिळालीय,मी तुमच्या प्रश्नांसाठी दिवसरात्र लढत राहील- आ.विजय भांबळे.
समशेर खान.
प्रतिनिधी.सेलु.
परभणी विजयश्री मित्र मंडळाच्या वतीने काल औरंगाबाद येथे दिनदर्शिका २०१८ अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न झाला. यावेळी मान्यवरांसह परभणी जिल्ह्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून नौकरी व शिक्षणासाठी परभणी जिल्ह्यातून बरेच तरुण व कुटुंब औरंगाबादला स्थायिक झाले. या ठिकाणी स्थायिक झालेले माझे जिव्हाळ्याचे लोक प्रत्येक निवडणुकीला माझ्यासाठी वेळात वेळ काढून मतदानाला येतात, मला आशीर्वाद देतात. तुमच्या प्रश्नांसाठी लढत राहणे ही माझी जबाबदारी आहे कारण विजय भांबळे आमदार फक्त तुमच्या सर्वांच्या मतांमुळे झाला आहे, तुमचं १-१ मत माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे.
त्याच अनुषंगाने आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याच्यासाठी "परभणी विजयश्री मित्र मंडळ" कार्यरत आहे. यंदाचे हे सहावे वर्ष असून प्रत्येकवेळेस संख्या वाढत आहे याचा मला मनापासून आनंद वाटतोय.
साडे तीन वर्षांपासून या सरकारच्या निर्दयी धोरणांमुळे शेतकरी, नौकरदार व समाजातील प्रत्येक व्यक्तीचे नुकसान झाले आहे. सध्या ७०% तूर आली तरी अजूनपर्यंत तूर केंद्र आपल्या मतदारसंघात सुरू केलेले नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आपलं सरकार नसून सुद्धा मी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करत मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे, मी आत्तापर्यंत कमी पडलो नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही असा शब्द मी याठिकाणी तुम्हाला देतो.
खऱ्या अर्थाने या सगळ्यांपासून सावध व्हायची वेळ आलेली आहे, या महाराष्ट्राच भलं व्हायचं असेल तर अजितदादा सारखा कार्यसम्राट व्यक्तीच मुख्यमंत्री झाला पाहिजे, अजितदादांशिवाय महाराष्ट्राच हित होणार नाही. आपल्या सगळ्यांना मिळून यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक सोमवारी जिंतूरला तर शुक्रवारी सेलू येथील कार्यालयात मी उपस्थित असतो, मतदारसंघातील आपल्या गरजा मला सांगाव्यात तसेच औरंगाबाद येथे सुद्धा आपल्याला काही अडचणी असतील तर परभणी विजयश्री मित्र मंडळाची सर्व टीम आपल्याला सहकार्य करेल शिवाय तुम्ही मलाही सांगू शकता, आम्ही सर्वजण आपल्यासाठी सदैव तत्पर आहोत असा विश्वास मी आपणास देतो.
या कार्यक्रमाला मेहनत घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
~ आ.विजय माणिकराव भांबळे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें