शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी रिक्त पदे भरण्याची गरज - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 फ़रवरी 2018

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी रिक्त पदे भरण्याची गरज

शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी रिक्त पदे भरण्याची गरज


शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांची  प्रधान सचिव नंदकुमार यांच्याकडे मागणी

शिक्षण विभागात तब्बल  ५४२ पदे रिक्त

 परभणी ( जिल्हा प्रतिनिधी)
                     मुलांचे  शैक्षणिक भवितव्य घडविणार्‍या परभणी जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागात अधिकारी मुख्याध्यापक यांच्यासह  शिक्षकांची ५४२ पदे रिक्त आसल्याचे शिक्षण सभापती सौ.भावनाताई नखाते यांनी प्रधान सचिव नंदकुमार यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र चे उद्दिष्टे पुर्ण करण्यासाठी तात्काळ रिक्त पदे भरावी अशी विनंती यावेळी केली आहे.
                            राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार हे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमातंर्गत शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी ९ फेब्रुवारी  रोजी परभणी येथे आले होते.त्यावेळी परभणी जिल्ह्यात शिक्षण विभागातील अधिकारी मुख्याध्यापकसह शिक्षकांची ५४२ पदे करीत असल्याचे वास्तवचित्र जि.प.उपाध्यक्षा तथा  शिक्षण सभापती सौ  भावनाताई अनिलराव नखाते यांनी त्यांच्यासमोर मांडले .
                        प्रधान सचिव नंदकुमार यांना दिलेल्या निवेदनात उपशिक्षणाधिकारी (०१) , गटशिक्षणाधिकारी (०४),मुख्याध्यापक वर्ग २(२९) ,शालेय पोषण आहार अधिक्षक (०४),सांख्यखी सहाय्यक (०१) ,प्राथमिक शिक्षक (३३६), उच्च श्रेणी मुख्याध्यापक (१६७) असे एकुण ५४२ पदे रिक्त  आसल्याचे नमुद केले आहे
                            मंजूर पदे हि विद्यार्थी संख्येच्या तुलनेत विभिन्न आहेत .यामुळे सहाजिकच उपलबध शिक्षकांवर अतिरीक्त कामाचा ताण वाढत आहे.यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यासारख्या  अभिनव उपक्रमासाठी हि रिक्त पदे अडसर ठरत आहेत.त्यामुळे रिक्त पदाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे .सौ भावनाताई नखाते यांनी केलेल्या विनंती बद्द्ल सकारात्मकपणे कार्यवाही केली जाईल असे प्रधान सचिव नंदकुमार यांनी अश्वासन दिले.

*मूळ पायाभूत पदामध्ये वाढीव पदे ग्राह्य धरावी*

                मूळ मान्य पायाभूत शिक्षकांची पदे व संच मान्यतेनुसार निर्माण झालेली शिक्षकांची पदे यामध्ये तफावत असून संच मान्यतेनुसार निर्माण झालेल्या पदांचा मूळ पायाभूत पदामध्ये सामावेश करून सर्व रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया करावी अशी मागणीही सौ भावनाताई नखाते यांनी केली .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें