सिल्लाेड:=आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जलयुक्त शिवार अंतर्गत गेवराई शेमी येथे सिंचन कामांचे उद्घाटन
सिल्लाेड दि.९(प्रतिनिधि अजय बाेराडे )गेवराई शेमी येथे जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खाेलीकरण,रुदिकरण व सिमेंट बंधार्याच्या कामाचे उद्हाटन माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते गुरवारी(८)संपन्न झाले.भाजप सरकार कर्जमाफी असाे वा कपाशीवरील बाेंडअळई प्रश्न असाे याबाबत गंभीर नसुन शेतकर्यांना वेठीस धरन्याचा उद्योग करत असल्याचा आराेप आमदार सत्तार यांनी यावेळी केला.हे सरकार शेती अन शेतकर्यापाेटी भरीव तरतुद करत नसल्याने आजही शेतकरी कर्जाच्या पाेटी टाेकाची भुमीका घेत असल्याचे ते म्हणाले.
सरपंच सतीश ताठे,मा.पंचायत समीती सदस्य माराेती ताठे,उपसरपंच पंकज जाधव,द्यानेश्वर जाधव,तालुका कृषि अधिकारी सुभाष आघाव,ठेकेदार अशाेक तायडे,मंडल कृषि अधिकारी चंद्रकांत निमाेड,उपअभियंता शेख साजेद,पर्यवेक्षक गणेश फुसे,सहायक विठ्ठल गाेराडे आदीसह उत्तम ताठे,बिस्मील्ला शहा,कडुबा काबंळे,अशाेक ताठे,दादाराव ताठे,गणेश घुगे,बाबुराव ताठे,रघुनाथ ताठे,रमेश ताठे,बापु घुगे,डिंगबर ताठे,लिंबाजी सांगळे,संताेष ताठे यांची उपस्थीती हाेती.
पांरपारीक शेतीला फाटा देउन शेतकर्यांनी कमी खर्चात कमी सिंचनातुन मिळनारी पिके घ्यावीत.बाजारात जे विकत तेच पिकवुन शेतकर्यांनी शेतीची कास धरल्यास नक्कीच ताेट्यातील शेती फायद्याची ठरेल असा विश्वास आमदार सत्तार यांनी यावेळी बाेलतांना व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें