सिल्लाेड:= चाैपदरी रस्ताच्या मुरुम कामात माती .:=आमदार अब्दुल सत्तार यांनी पंचनामा करण्याची तहसीलदार यांना दिली सुचना
सिल्लाेड दि.९(प्रतिनिधि अजय बाेराडे )औरंगाबाद ते अजींठा चाैपदरी रसत्याच्या सुरु झालेल्या रुंदीकरणात माती मिश्रीत मुरुमाचा हाेत असलेल्या वापराची पहानी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी करुन तहसीलदार यांना पंचनामा करण्याचे निर्देश या प्रकरणी दिले आहेत.
औरंगाबाद ते अजींठा या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्दा युध्द पातळीवर सुरु आहे.या कामात माेठ्या प्रमाणात माती मिश्रीत मुरुमाचा वापर सर्रासरित्या हाेत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आल्या हाेत्या.या अनुशंगाने आमदार सत्तार हे धाेत्रा येथील सिध्देश्वर महाराज यात्रा महाेत्सवाची पूर्व तयारी बैठक उरकुन सिल्लाेड कडे येत असतांना गाेळेगाव येथील श्री च्या कमानीजवळ मातीमिश्रीत मुरुमाचा रस्ता कामासाठी सुरु असलेला वापर त्यांच्या नजरी पडला.
आमदार सत्तार यांनी सुरु असलेल्या या कामाची पहानी केली .व साेबतच असलेल्या नायब तहसीलदार संजय साेनवने यांना निकृष्टरित्या सुरु असलेल्या कामांचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले.यावेळी अजींठा पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक श्री.अहीरे,नगरसेवक शेख सलीम,खरेदी विक्री संघाचे संचालक संजय मुरकुटे,राजुमियाँ देशमुख आदींची उपस्थीती हाेती.
चाैकट:=खेळणा धरनातील मरुम रस्तासाठी वापरावा
दरम्यान रस्ता रुंदीकरनासाठी खेळणा मध्यम प्रकल्पातील असलेल्या मुरुमांचे ढिगार उकरून ताे मुरुम सुरु असलेल्या रस्ता रुंदीकरनासाठी वापरन्यात यावा.असा अहवाल तयार करुन ताे मंजुर करून त्याची अंमलबजावनी करावी अशी सुचना आमदार सत्तार यांनी नायब तहसीलदार संजय साेनवने यांना दिली.यामुळे धरनाची साठवन क्षमता वाढेल व पाण्याची काही प्रमाणात उपलब्धता यातुन साधता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें