कृषी प्रदर्शनाच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन
समशेर खान.सेलू :- सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उदघाटन दि. 8 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील शासकीय विश्रामगृहा शेजारील डख काॅम्पलेक्स मध्ये बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालय थाटण्यात आले आहे. या कार्यालयातून प्रदर्शनात आयोजित विविध कार्यक्रमाचे नियोजन शेतकऱ्यांपर्यत पोहचवण्यासाठी अद्ययावत व अत्याधुनिक यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, डॉ. प्रतापराव घांडगे, मोहनराव बोराडे, प्रा. टेंगसे सर, प्रा विठ्ठलराव डख, सर्जेराव लहाने आदींची उपस्थिती होती. यावेळी सेलू तालूका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मोहनभाऊ बोराडे यांची निवड झाल्या बद्दल मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालूकाध्यक्ष वसंतराव बोराडे, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, बजरंग आरकुले, कृष्णा रोडगे, राहुल शेरे, ओंकार लिपणे, शिवाजी पवार, निखिल सोमाणी, शिवाजी पांचाळ आदी परिश्रम घेत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें