कौसडी येथील जिल्हा परिषद शाळे समोर अतिक्रमण
+अतिक्रमण केलेल्या जागेचा शेळया मेंढ्या बांधण्यासाठी तसेच कचरा साठवण्यासाठी होतो वापर
+विद्यार्थ्यांचा आरोग्य धोक्यात शिक्षण विभागाने व स्थांनीक ग्रा.प.ने लक्ष देण्याची गरज
शे.नयुमोद्दिन.कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद शाळे समोर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण करून त्या जागेचा शेळ्या मेंढ्या बांधण्यासाठी वापर केला जातो व तसेच शाळे समोर उकंडे कचरा साठवन केला जात आहे
या मुळे पंधराशे विद्यार्थ्यांचा आरोग्य धोक्यात येऊ शकते
या जिल्हा परिषद शाळे समोर काही नागरिकांनी अनेक दिवसा पासुन अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण उठवण्यासाठी शाळेच्या अधिका-यानी व ग्रामपंचात ने कोनतीही भुमीका दाखवली नसल्याने हे अतिक्रमण धारक शाळे समोरच्या जागेवर ताबा करून तेथे मेंढ्या शेळ्या व जनावरे बांधण्यासाठी गोठेही उभारण्यासाठी कमी करणार नाही
विद्यार्थ्यांना शाळेत जातांनी दुर्गंधीचा सामना करावा लागतों
तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांचा आरोग्य पन धोक्यात येवु शकते या अतिक्रमण धारकांनवर स्थानीक ग्रामपंचात ने व शिक्षण विभागाच्या अधिका-यांनी लवकर आळा घालुन त्या जागेवर तार बाॅन्ड्री किंवा कंपाउंड वाल बांधुन घ्यावेत व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येवु याची काळजी घ्यावी अशी पालकाकडुन मागणी होत आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें