- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 फ़रवरी 2018

पेट्रोल - डिझेल दरवाढीचा निषेध

पेट्रोल - डिझेलची दरवाढ करुन सर्वसामान्य जनतेच्या खिशाला काञी - युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर

शे.सलिम.
भोकरदन (प्रतिनिधी) मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा व पेट्रोल - डिझेल दरवाढीचा युवक काँग्रेसच्या वतीने भोकरदन येथे निषेध व्यक्त करीत जालना लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर,जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालयास दरवाढीविरोधात निवेदन सादर करण्यात आले .
मोदी सरकारने निवडणुकीपुर्वी (2014 साली )जनतेची दिशाभूल करुन व महागाईचा उदो उदो करीत सत्ता हस्तगत केली. शेतकरी,सर्वसामान्य व युवकांना वेग वेगळे आमिष दाखविले.परंतु सत्तेत आल्यानंतर उलट महागाईचा आलेख वाढताच ठेवला असल्याची खंत व्यक्त करीत दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेल दरवाढ करुन सर्वसामान्य जनतेच्या खिशाला काञी लावण्याचे काम करण्यात येत असल्याचे मत जालना लोकसभा युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले. युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात युवक काँग्रेसचे वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत भाजप सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा भ्रमनिरास करणारा असुन शेतकरी - शेतमजुर गोरगरिबांच्या अपेक्षांना कुठलाच थारा नाही म्हणूनच हा अर्थसंकल्प जनतेच्या हिताचा नसून फक्त आमिषे दाखविणारा आहे. सुशिक्षित बेरोजगारांनाही कुठेच रोजगार उपलब्ध करुन देण्यात सरकारला यश आलेले नाही. तरी शासनाने पेट्रोल व डिझेल दरवाढ परत घ्यावी व बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा असी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादर करण्यात आले यावेळी राहूल देशमुख (अध्यक्ष भोकरदन विधानसभा युवक काँग्रेस),ञिंबकराव पाबळे(तालुका अध्यक्ष),नगरसेवक राजेंद्र गौर,सत्तार हुसैन,रुपेश जैस्वाल,अमित आरके, अब्दुल बासित,मनोहर आरके,फईम पठाण, वाघसाहेब,दाभाडेसाहेब,जुनेद खान (जाफ्राबाद तालुका अध्यक्ष),नानासाहेब जाधव,दिपक आगलावे,मंगेश पगारे,शेख सादीक,योगेश सोनवणे,मनोहर आरके,तौसिफ पठाण आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें