इब्राहिमपुर येथे ग्रामसभेत चौदा वित्त, घरकुलचा मुद्दा गाजला
गरीबांना सोडुन धनदांडग्याला लाभ !
शे.सलिम.
भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपुर येथे शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत कार्यलयासमोर सकाळी 9 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या ग्रामसभेत घरकुलचा मुद्दा चांगलाच गाजला , दरम्यान गेल्या आठ महिन्या पूर्वीच्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेमधुन खऱ्या लाभार्थीची निवड करण्यात आली होती .त्या लाभार्थींनी खरोखर आजपर्यंत शासनाचा कुठलाही योजनेचा लाभ घेतला नसुन तसेच आज ही ते लाभार्थी बेघर आहे अशा लाभार्थीची ग्रामसभे मधुन निवड करण्यात ही आली होती . तसा ग्रामसभेत ठराव ही मान्य करण्यात आला होता. मात्र
रमाई घरकुल योजनाचे खरे लाभार्थी या योजने पासुन वंचित ठेवले आहे . आणि धनदांडगे लाभार्थी या योजनेत ग्रामपंचायतने निवड केल्याचा आरोप येथील नागरीकांनी केला असुन निवड झालेल्या लाभार्थ्यांची वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून त्यांना या योजनेचा लाभ द्यावा , विशेष म्हणजे या लाभार्थ्याकडे पक्के घरे असुन काही लाभार्थ्यांच्या कुटुंबात यापुर्वी देखील घरकुलचा लाभ घेतलेला आहे .तसेच चौदा वित्त आयोगाचा ग्रामपंचायतला किती निधी मंजूरझाला व तो कोणत्या कामावर खर्च केला असाही सवाल उपस्थित करण्यात आला . विशेष म्हणजे काही नागरिकांनी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत जवळील स्वच्छलयाचा पंचनामा केला असता दोन्ही ही स्वच्छलय बंद असुन घाणीचे साम्राज्य देखील पसरलेआहे तसेच दरवाजे तुटलेल्या अवस्थेत दिसुन आले .याबाबत काही नागरिकांनी सरपंच यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली . मात्र एकीकडे शासन गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छलयावर लाखो रुपयांचा खर्च करीत असले तरी ग्रामपंचायत स्वच्छलया विनाच आहे. आधी तुमचा स्वच्छलय दुरुस्त करा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें