- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 4 फ़रवरी 2018

सोनपेठ येथे संतशिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी


गुणवंतांना प्रेरणादायक उपक्रम राबविने ही सामाजिक बांधिलकी-राजेश्वर खेडकर


सोनपेठ (राजेश खेडकर)
येथील श्री संतशिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे संत नरहरी सोनार यांची ७३२वी पुण्यतिथी नुकतीस साजरी करण्यात आली. यानिमित्त आज महाप्रसाद व समजातील गुणवंत तरुणांचा सोनपेठ समाज बांधवांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक वृत्त असे की, येथील सुवर्णकार समाज बांधवांच्यावतीने संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथी निमित्त दि. ०३ जानेवारी रोजी किर्तनाचे आयोजन करण्यात येऊन आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गेल्या महिनाभर परभणी येथील सुवर्णकार बांधवांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील अंतीम सामना विजयी संघात सोनपेठ येथील गणेश राजेश्वर खेडकर व सागर सुरेश टाक या तरुणांचा समावेश होता. स्पर्धे दरम्यान सर्वच सामन्यातुन यांची कामगिरी लक्षनिय होती. या यशाबद्दल त्यांचा सोनपेठ सोनार समाजाच्यावतीने कारागीर संघटनेचे अध्यक्ष किसनराव टाक, सराफ असोशियएसनचे अध्यक्ष विष्णुपंत दहिवाळ यांच्या हस्ते पुष्पहार, श्रीफळ व संत शिरोमणी नरहरी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना राजेश्वर खेडकर यांनी समाजातील प्रत्येक होतकरु व प्रतिभावंत मुला मुलींच्या प्रतिभेस वाव देण्यासाठी त्यांन सतत प्रोत्साहन देणे ही सामाजिक बांधिलकी असुन यासाठी जानिवपुर्वक प्रयत्न करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास कारागीर संघटनेचे अध्यक्ष किसनराव टाक, सराफ असोशियएसनचे अध्यक्ष विष्णुपंत दहिवाळ, दुर्गादास आंबेकर, सुर्यकांत लोलगे, गोपाळराव शहाणे, प्रभाकरराव कुलथे, अशोक दहिवाळ, राजेश्वर खेडकर, बाबुराव वेदपाठक, बबन वेदपाठक, राजाभाऊ दहिवाळ व आदी समाज बांधवांची ऊपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रविण कुलथे, संजय शहाणे, संदिप आंबेकर, निलेश टाक, सौरभ टाक, अतूल दहिवाळ आणि तरूणांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें