जुन्या राजकीय वादातून एकाची हत्या - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 फ़रवरी 2018

जुन्या राजकीय वादातून एकाची हत्या

*जुन्या राजकीय वादातून एकाची हत्या*


उखळी (खु.) येथील घटना


सोनपेठ (राजेश खेडकर)
सोनपेठ तालुक्यातील उखळी(खु.) येथे जुन्या राजकीय वादातून विद्यमान सरपंचाच्या दिराचा भर रस्त्यात खून झाल्याची घटना घडली आहे.
 याबाबत अधिक माहीती अशी की, सोनपेठ तालुक्यातील उखळीु(खु.) येथील ईश्वर आप्पाराव फड (वय ५०) यांचा सन २०१७ मधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी गावातीलच राजकीय विरोधक राम फड यांच्यासोबत वाद झाला होता, तेंव्हापासून या दोघात वरंवार वादावादी होत असे. याबाबत परस्पर विरोधी गंगाखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेही  दाखल आहेत तसेच गंगाखेड न्यायालयात सुनावनी चालू आहे. जि.प.निवडणुकीत पराभुत झाल्याचा रोष मनात ठेवुन असलेल्या आरोपी राम पांडुरंग फड व त्याचे साथिदार ज्ञानोबा मुंडे, नागनाथ मुंडे, आनंता फड, ज्ञानेश्वर फड, पंडित फड, अरुण फड, वसंत फड, सोपान फड, व्यंकटी फड, देवनाथ फड, तुकाराम फड, दगडोबा मुंडे, ज्ञानोबा फड, फुलचंद फड, संग्राम मुंडे, अंकुश फड, गणेश फड, निलेश फड हे सर्व राहनार उखळी (खु.) व राम फड यांचा भाचा रा.फावडेवाडी यांनी संगनमताने राजकीय द्वेशापोटी ईश्वर फड यांचा खुन केल्याची फिर्यात मयताचा मुलगा ज्ञानेश्वर इश्वर फड यानी सोनपेठ पोलीसात केली आहे. इश्वर फड हे नेहमीप्रमाणे मोटरसायकलवरुन उक्कडगाव रेल्वे स्टेशन परिसरातून परळी कडे जात असतांना राम फड व त्याच्या साथीदारांनी मोटरसायकलवर पाठलाग करुन धारदार कत्ती, चाकू व लाठ्या काठ्यांनी  वार केले व घटना स्थळावरून पलायन केले व यात गंभीर जखमी झालेल्या ईश्वर फड यांना अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती.रुग्णालयात नेत असतांना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे फिर्यादित नमुद केले आहे.
ज्ञानेश्वर इश्वर फड यांच्या फिर्यादी वरुन आज दि.१४ फेब्रुवारी २०१८ रोजी सोनपेठ पोलीसात २४/२०१४ कलम ३०२, ३२४, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, १२० व भादवी १३५ नुसार गुन्ह्याची नोंद झाली असुन या प्रकरणी अद्याप कोनालाही अटक झालेली नाही.
घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पो.नि.सोपान सिरसाठ व स.पो.नि. बाबुराव जाधव हे करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें