सेलू तालुक्यातील सर्व जनतेला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याचे आव्हान
अर्जुन बोरुळ मित्रमंडळाचा सहकार्याने घेण्यात येणारा उपक्रम
समशेर खान.सेलू प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व जनतेला कळविण्यात येतेकी डोळ्यांची तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील जेजे रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिरासाठी अर्जुन बोरूळ मित्र मंडळ यांच्यावतीने तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत शस्त्रक्रिया शिबिरास नेण्याची आयोजन करण्यात आले आहे यावेळी सर्व तालुक्यातील जनतेला अर्जुन बोरुळ मित्रमंडळाच्या वतीने तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान करण्यात येते की शेतकरी शेतमजूर मजूर व गरीब जनतेला मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील जेजे रुग्णालयात घेऊन जाण्यात येईल यासाठी तालुक्यातील जनतेने मित्र मंडळा कडे संपर्क करण्याचे आव्हान मित्रमंडळाचे अध्यक्ष अर्जुन बोरूळ यांनी यावेळी केली आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें