आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटूंबाला आर्थिक मदत
सेलु कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा पुढाकार व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली
समशेर खानसेलु- प्रतिनीधी
तालुक्यातील कवडधन येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी गोपीनाथ अमृतराव काकडे यांच्या कुटुंबियांना आधार बाजार समितीच्या वतीने मा आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली
गोपीनाथ अमृतराव काकडे याने आत्महत्या केली होती गरीब कुटुंबाला आधार म्हणून त्याची तात्काळ दखल घेऊन त्या आत्महत्याग्रस्त कुटूंबाचे सांत्वन करून त्यांना रोख 11000 धनादेश देण्यात आला माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आर्थिक मदत केली आहे. शेतकर्यांनी आत्महत्या न करता संयम बाळगून कोणत्याही कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस ठेवावे शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवाव्यात असा सल्ला यावेळी माजी आ रामप्रसाद बोर्डीकर यांनी शेतकऱ्याला दिला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र डासाळकर व उपसभापती सुंदर गाडेकर संचालक दामोदर दळवे दिनकर वाघ दत्तराव जाधव शिवाजीराव डख उद्धवराव काकडे अर्जुन बोरुळ सुशील खेडकर ,अँड.रामेश्वर शेवाळे विठ्ठल को कर आदींची यावेळी उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें