सेलु कृषी उत्पन्न बाजार समितीत तुर खरेदी केंद्र सुरू - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 फ़रवरी 2018

सेलु कृषी उत्पन्न बाजार समितीत तुर खरेदी केंद्र सुरू

सेलु कृषी उत्पन्न बाजार समितीत तुर खरेदी केंद्र सुरू

समशेर खान
सेलू प्रतिनिधी
 येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे शासन हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्ररा डासाळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे

                 येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी शेतमालाची आवक चांगली झाली होती शेतकऱ्याकडून शासनाचे हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी सभापती रविंद्र डासाळकर यांनी लक्षात घेता माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाफेडची हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला जिल्ह्यातील पहिले हमीभाव केंद्राची सुरुवात सेलू तालुक्यापासून करण्यात आली त्यामुळे तुर खरेदी चा हमीभाव 5450 असून या भावाने तुर खरेदी केली जाईल तरी शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे जास्तीत जास्त तुर आणून नाफेडच्या हमीभावाचा फायदा घ्यावा असे आव्हान देखील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आले आहे

सन 2017 18 या हंगामासाठी नाफेडच्या मार्फत तुरीची खरेदी at फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे तालुक्यातील जास्तजास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करून तुर खरेदी आयोजनाचे लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आली आहे याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र डासाळकर उपसभापती सुंदर गाडेकर सचिव प्रकाश पोळ खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष मुकेश बोराडे वाईचे सरपंच रामचंद्र आघाव खवने पिंपरी चे सरपंच दगडू चव्हाण पांडू तात्या गजमल बाजार समितीचे कर्मचारी राजीव वाघ अशोक वाटोडे राऊत देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती



उर्वरित शेतकऱ्यांनी तुर विक्रीसाठी  नोंदणी करावी_________ सभापती रवींद्र डासाळकर

  सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना नाफेड खरेदी केंद्राची मागणी लक्षात घेऊन सभापती रविंद्र डासाळकर यांनी सेलू येथे नाफेडचे खरेदी केंद्र चालू केल्या असून या खरेदी केंद्र सर्व शेतकऱ्यांनी तुर खरेदी करण्यासाठी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करावी असे आवाहन सभापती रविंद्र डासाळकर यांनी यावेळी केले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें