पाणी उपाययाेजना बाबत बुधवारी(७)खेळणा प्रकल्पाची पाहनी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केली.
सिल्लाेड दि.७(प्रतिनिधि अजय बाेराडे)सिल्लाेड शहरासह तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्या खेळना प्रकल्पातील पाणीसाठा एक महीना पुरेल एवढाच शिल्लक अाहे.यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवन्यासाठी प्रकल्पात चर मारणान असल्याची माहीती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.पाणी उपाययाेजना बाबत बुधवारी(७)खेळणा प्रकल्पाची पाहनी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी केली.खेळना प्रकल्पातुन सिल्लाेड शहरासह उंडणगावात,भराडी,पालाेद,माेढा,वांगी,खंडाळा आदी गावांना पाणीपुरवठा हाेताे.यंदा खेळना धरन क्षेत्रावर पाउसच न झाल्याने गतवर्षीचा जुनाच पाणीसाठा त्यात आहे.याच साठ्यावर आतापर्यंत सिल्लाेड सह तालुक्यातील अनेक गावांना चार दिवसाआड पाणी पुरविले गेले.मात्र आता धरनात जेमतेम पाणी शिल्लक आहे.पंधरा दिवसच पाणी पुरेल ही परीस्थीती ओढावल्याने आमदार सत्तार यांनी खेळना प्रकल्पाची पाहणी करून माहीती करून घेतली.
कमी पावसामुळे सिल्लाेड तालुक्यात जानेवारी महीन्यातच पाण्याच्या झळा सुरु झाल्या असून तालुक्यात अकरा गावात विहीरी अधिग्रहण झाल्या असून तीन गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.विहार अधिग्रहण व टँकर वर पाण्याची भिस्त वाढन्याची शक्यता आहे.यासाठी तालुक्यातील जनता पाण्यापासून वंचीत राहनार नाही याची खबरदारी घेन्याच्या सुचना संबंधित यंत्रनेला आमदार सत्तार यांनी दिल्या .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें