कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरीः - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 फ़रवरी 2018

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरीः

कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात श्री संत सेवालाल महाराज जयंती साजरीः

सोनपेठ(राजेश खेडकर)
येथील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात ईंग्रजी विभागाच्या वतीने 'संत सेवालाल महाराज जयंती' निमित्त प्रा.किरण नानीवडेकर, प्राचार्य दत्ता नरहरे सरांचे *'ईंग्रजी भाषेचे महत्त्व'* या विषयावर व्याख्यान  आयोजित करण्यात आले. या प्रसंगी ईंग्रजी विभागाच्या वतीने *'श्री संत सेवालाल महाराज' भित्तीपत्रकाचे प्रकाशन* करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सातपुते सर होते. कार्यक्रमाचे प्रास्तविकामध्ये प्रा.विठ्ठल जायभाये यांनी श्री संत सेवालाल महाराज यांचे कार्य, शौर्य व समाज प्रबोधन ईत्यादि विषयावर सविस्तर विवेचन केले.तसेच या प्रसंगी नानीवडेकर सर, नरहरे सरांनी विद्यार्थ्यांना 'ईंग्रजी विषयाचे महत्त्व' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डॉ. सातपुते सरांनी ईंग्रजीचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पंडीत राठोड यांनी तर प्रा.दिलीप कोरडे सरांनी आभार मानले. या प्रसंगी श्री परळकर एस.डी. प्रा. सतीश वाघमारे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें