सोनपेठ येथे शिव जयंती निमित्त ग्रंथदान
डॅा.झाकेर हुसैन ऊर्दु माध्यमिक विद्यालयात उद्या होनार कार्यक्रम
सोनपेठ(राजेश खेडकर)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ जि.परभणी च्यामाध्यमातुन उद्या दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ शुक्रवार रोजी सकाळी ठिक १०-०० वाजता येथील डॅा.झाकेर हुसैन ऊर्दु माध्यमिक विद्यालय सोनपेठ येथे ग्रंथदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन हायस्कुलचे मुख्याध्यापक अफझाल सिद्धीकी हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तर गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण व पो.नि.सोपान सिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी तालुक्यातील-
१) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणीसंगम
२)लाल बहादुर शास्त्री माध्य. विद्यालय लासिना
३)श्री महालिंगेश्वर विद्यालय सोनपेठ
४)कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ
५)डॅा.झाकेर हुसैन ऊर्दु माध्यमिक विद्यालय सोनपेठ
या पाच शाळांना सोनेराव राजेसाहेब गायकवाड यांच्यावतीने ग्रंथदान करण्यात येनार आहे. यापुर्वीही चळवळीच्यावतीने शिव जयंती, भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरिनिर्वाण दिनी, शहीद टिपू सुलतान जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती आदी प्रसंगी मिरवणुकीवर अवास्तव खर्चास फाटा देत जयंती दिन *नाचुन नाही तर वाचुन अर्थात ग्रंथदान करुन* साजरे करुन पंचक्रेशीत यामाध्यमातुन एक आदर्श निर्माण केला आहे. उद्याच्या ग्रंथदान कार्यक्रमास ग्रंथ वाचन चळवळीचे सर्व सदस्य ग्रंथप्रेमीं व पत्रकार बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष राजेश खेडकर यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें