महाशिवरात्रीनिमित्त परळीत होणार शिव पुराण ज्ञान महायज्ञ - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

महाशिवरात्रीनिमित्त परळीत होणार शिव पुराण ज्ञान महायज्ञ

महाशिवरात्रीनिमित्त  परळीत होणार शिव पुराण ज्ञान महायज्ञ

भव्य शोभा यात्रेने श्रीगणेशा होणार शिवकथेचा

सोनपेठ(राजेश खेडकर)

महाशिवरात्रीनिमित्त दि. ८ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१८ दरम्यान शिव पुराण ज्ञान  महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील हालगे गार्डन मध्ये सलग ९ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात परमपुज्य श्री गिरी बापूजी महाराज शिव कथेचे विवेचन करणार आहेत.  सकाळी ११ वाजता शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भव्य शोभा यात्रा सुरु होईल. त्यांनतर अग्रवाल लॉज, मोंढा, टॉवर, तळ, पोलीस स्टेशन मार्गे हालगे गार्डन येथे शोभा यात्रा पोहचेल.
विशेष म्हणजे या शिवकथे साठी गुजरातमधून दोन हजारपेक्षा अधिक भाविक भक्त परळीत येणार आहेत. शिवकथे सोबत दररोज सकाळी ८ ते ११ वाया दरम्यान गायत्री यज्ञ संपन्न होईल. तर शिवकथा दररोज दुपारी ३ ते संध्याकाळी साडे सहा दरम्यान कथन केली जाईल. या कार्यक्रमात कथा महात्म्य, शिव प्रागट्य, शिवलिंग महत्त्व, ओम नमः शिवायमहामंत्र महत्त्व, रुद्राक्ष महत्व, बेलपत्र महत्व, सती प्रागट्य महत्व, शिव पार्वती विवाह,कार्तिकेय प्रागट्य, गणेश प्रागट्य, बारा ज्योतिर्लिंगाच्या कथा, पार्थिव लिंग पूजा, शिवपुराणमधील अनेक प्रसंग आदी गोष्टींचे विवेचन श्री गिरी बापूजी महाराज करणार आहेत. शिवकथेचे थेट प्रसारण दररोज आस्था वाहिनी व मराठवाडा साथी पीसीएन न्यूजवरूनही प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन खाटुवाला परिवार आणि संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें