संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी महाराष्ट्रभर साजरी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी महाराष्ट्रभर साजरी

समाजउपयोगी उपक्रमांचे करण्यात आले आयोजन

सोनपेठ(राजेश खेडकर)
संतश्रेष्ठ शिरोमणी श्री नरहरी महाराज  यांची ७३२ वी पुण्यतिथी महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यासह महाराष्ट्रात सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम, अन्नदान, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, ग्रंथदान, प्रोत्साहनपर स्पर्धा, गुणवंतांचा सन्मान असे विविध समाजपयोगी उपक्रम राबवत भव्य मिरवणुकांसह उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमांमध्ये सोनार समाज बांधवांसह अन्य समाजाच्या बंधू भगिनींनीसुद्धा सहभाग नोंदवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या किर्तीची उंची वाढवली.
गेल्या  दीड महिन्यांपासून सर्व समाजबांधव समाजभगिनी पुण्यतिथी उत्सव साजरा करण्याविषयी  आवहनात्मक संदेश विविध माध्यमांद्वारे प्रसारित करत होते. त्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.
सर्व ठिकाणच्या कार्यक्रमांचे संयोजक,  आयोजक तसेच सहभागी समाजसेवक, समाजसेविका, समाजबांधव, समाजभगिनी आदींचे लक्ष्मीकांतराव मुंडलीक यांनी यानिमित्त अभिनंदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें