- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 फ़रवरी 2018

डासाळा ग्रामपंचायतीला पडला स्वच्छतेचा विसर

   तुंबलेल्या नाल्या रस्त्यावरील घाण व पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ह्यामुळे डासाळा येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

सेलु प्रतिनिधी(समशेर खान)
तालुक्यातील डासाळा ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला चार ते पाच महिने होऊन गावातील ग्रामस्थांनी जनतेतून सरपंचाची निवड करून सरपंच निवडुन दिला यामुळे गावाकडे पाहण्यास कोणताही अधिकारी अथवा सरपंच तयार नसल्याचे गावातील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे
नवीन पंचवार्षिक ग्रामपंचायतीचा कारभार एकप्रकारे चालू झाला असून ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्यामुळे गावात स्वच्छतेचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे केंद्र व राज्य शासनाने सर्वत्र स्वच्छतेचा कानमंत्र दिल्या असून डासाळा ग्रामपंचायतीला या स्वच्छतेविषयी कोणताही देणे घेणे नसल्याचे गावातील नागरिकांमध्ये चर्चा आहे तुंबलेल्या नाल्या घन कचरा डासांचा प्रादुर्भाव यामुळे गावातील ग्रामस्थांचे व बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामध्ये मोठ्या ग्राम पंचायतीला एकच सेवक असल्यामुळे त्या सेवकाने काय काय कामे करायची असा सवाल गावकऱ्यांमध्ये उपस्थित झाला आहे यामुळे गावकरी पाहण्यास सरपंच ग्रामसेवक कोणीच तयार नसल्याचे यावेळी दिसत आहे जनतेतून निवडून दिलेला सरपंच ग्रामस्थांना स्वच्छ पाणी विज रस्त्यावरील लाईट ह्या सर्व गोष्टी नवीन पदाधिकाऱ्यांना विसर पडला असून डासाळा ग्रामपंचायतीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही ठसे चित्र मात्र दिसत आहे

प्रतिक्रिया==
डासाळा ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे वाजले बारा________ संजय रामराव गजमल.   राष्ट्रवादी कार्यकर्ते डासाळा

   ग्रामपंचायत  निवडणुकीला चार महिने पूर्ण होऊन डासाळा ग्रामपंचायतीचे सरपंच जनतेतून निवडून आले असून त्यांना व त्यांच्या ग्रामपंचायतीला स्वच्छतेचे काहीच महत्त्व नसून गावात दुर्गंधी कचरा नाल्यान काढणे पिण्याच्या पाण्याची सोय नाही गावातील नाल्या नकाने डासांची फवारणी नाही यामुळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे यापुढे जर ग्रामपंचायतीने स्वच्छता केली नसल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संजय रामराव गजमल यांनी दिला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें