- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 फ़रवरी 2018

जिंतूरात नागरिकांच्या समस्यांसाठी भाजपा सरकारचे समाधान शिबिराचे आयोजन.

पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर राहणार उपस्थित

तालुक्यातील नागरिकांनी लाभ घेण्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश काजळे यांचे आवाहन

सिराजोद्दिन नदवी.
प्रतिनिधी.जिंतूर.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालयात दि 7 फेब्रुवारी रोजी भाजप सरकारच्या वतीने समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या थेट मंत्री मोहदयाकडे मांडाव्यात असे आव्हान भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश काजळे यांनी केले आहे..

राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी तालुका पातळीवर समाधान शिबीर आयोजन करण्यात आले आहे यात ग्रामीण भागातील मजुरांसाठी असलेली रोजगार हमी योजना,श्रावणबाळ,निराधार,विधवा, सिंचन विहीर,विशेष घटक योजना,रमाई आवास,राजीव गांधी आवास योजना,पंतप्रधान आवास योजना,मागेल त्याला शेततळे,भूसंपादन,शेत रस्ते,पांदण रस्ते तसेच विजवितरण कंपनीच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत या समाधान शिबीरास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री मा बबनराव लोणीकर,राहुल लोणीकर,रामप्रसाद बोर्डीकर हे उपस्थित राहणार आहेत यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष अभय चाटे,मेघना बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे म्हणून तालुक्यातील नागरिकांनी समाधान शिबिरात आप आपल्या समस्या घेऊन थेट मंत्री मोहदया समोर ठेऊन सोडविण्याचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश काजळे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें