- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 5 फ़रवरी 2018

कर्जबाजारीपणाला कंटाळुन शेतक-यांनी संपवली जिवनयात्रा
◆कवडधन येथील घटना
सेलु(प्रतिनिधि) :सतत नापिकी तसेच बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या चिंतेत असलेल्या कवडधन येथील शेतकरी गोपाळ अमृतराव काकडे(32) यांनी आपली जिवन यात्रा संपविली. त्यांनी रविवार 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास शेतामध्ये नायलोन दोरीच्या सहाय्याने बाभळीच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली.आत्महत्या करण्याचे कारण त्यांची गट क्र. 101 मध्ये शेती आसुन त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर करत असत परंतु सतत होत असलेली नापिकी तसेच स्टेट बँक आँफ इंडिया व देना बँकेचे कर्ज घेतले होते कर्जाची परत फेड वेळेत होत नसल्याने ते चिंतेत राहत असत त्या नौराशेतुन त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदरील घटनेची माहीती मयताचे भाऊ गोविंद अमृतराव काकडे यांनी पोलिस ठाणे येथे दिली व मयतास शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सेलु पोलिस ठाणे येथे शेतकरी आत्महत्या ची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शंकर पांढरे हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें