तर भारताला जगात नामर्द म्हटले जाईल: संजय राऊत
विशेष.प्रतिनिधी.(समशेर खान)*सीमेवर पाकिस्तानच्या कारवायांवर लगाम लावण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. पाकिस्तानने भारतीय जवानांवरील हल्ल्यांसाठी मिसाईल्सचा वापर केला. मग आपल्याकडील क्षेपणास्त्र हे राजपथावरील संचलनासाठीच आहेत का?, जर भारताने चोख प्रत्युत्तर दिले नाही तर जगात भारताला नामर्द म्हटले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.*
*जम्मू- काश्मीरच्या राजौरी आणि पूँछ जिल्ह्यांमध्ये रविवारी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबार आणि उखळी तोफांच्या माऱ्यात लष्कराचे तीन जवान आणि कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद झाले. पाकिस्तानच्या या कृत्यावरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने पाकला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.*
*एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, पाकिस्तानने रविवारी भारतीय जवानांवर हल्ला करण्यासाठी मिसाईल्सचा वापर केला. मग आपल्याकडील क्षेपणास्त्रांचा वापर फक्त राजपथावरील संचलन आणि २६ जानेवारीला परदेशी पाहुण्यांना दाखवण्यासाठीच करणार का, असा सवाल त्यांनी विचारला. शस्त्रसंधीच्या उल्लंघनापेक्षा हे सरळ सरळ युद्धच आहे. हा भारतावरील हल्ला आहे आणि त्याला प्रत्युत्तरही तशाच पद्धतीने दिले पाहिजे. जर तुम्ही तसे उत्तर दिले नाही तर जगात भारताला नामर्दच म्हटले जाईल, असे राऊत यांनी म्हटले आहे.*
*केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील पाकच्या गोळीबारावर प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानला माफ करणार नाही. पाकिस्तानचा मूर्खपणा यातून दिसत असून त्यांना याचे परिणाम भोगावेच लागतील, असे त्यांनी म्हटले आहे.*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें