नोकर भरती कपातीच्या निर्णयाने तरुणांमध्ये असंतोष - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 फ़रवरी 2018

नोकर भरती कपातीच्या निर्णयाने तरुणांमध्ये असंतोष

नोकर भरती कपातीच्या निर्णयाने तरुणांमध्ये असंतोष

निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा, स्पर्धा परीक्षा शुल्काचा प्रश्न ही ऐरणीवर

सिल्लोड ( प्रतिनिधी अजय बाेराडे ) दि. 6, सिल्लोड सोयगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दिवसरात्र अभ्यास करून विविध ठिकाणी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अर्ज केले आहेत. केंद्र व राज्य सरकार कोट्यावधी सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देणार या अश्वासनाने  देश सेवेची आस लागलेल्या या युवकांना शासन अत्यल्प प्रमाणत सरकारी नोकर भरती करीत आल्याचे लक्षात आल्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी सरकारने सरकारी नोकर भारतीचे आश्वासन पूर्ण न केल्यास आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

तालुक्यातील अनेक तरुण पोलिसांत आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यापासून प्रेरणा घेऊन पोलीस भरती साठी शेतकऱ्यांच्या मुलांनी जीवाचे रान केले . मात्र मा. मुख्यमंत्री यांनी पोलीस भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली असल्याचे या तरुणांचे म्हणणे आहे. 2017 मध्ये मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये 12 हजार पोलिसांच्या रिक्त जागा भरणार असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात फक्त 5 हजार पोलिस पदासाठी भरती करण्यात आली उर्वरित जागा चे काय असा सवाल या युवकांनी केला आहे.नोकरी ची प्रतीक्षा करीत असताना अनेकांचे वय वाढल्यामुळे त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहेत. असेच आमच्या सोबत झाले तर आत्महत्याशिवाय आमच्या कडे पर्याय नाही असे स्पष्ट करीत पोलीस व स्पर्धा परीक्षेच्या अधिक जागा वाढवून त्यासाठी लागणारे परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार सिल्लोड यांना देण्यात आले आहे. याबाबद सकारात्मक विचार न झाल्यास येत्या 10 फेब्रुवारी रोजी सुशिक्षित युवक तसेच स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, माजी उपनगराध्यक्ष शनकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ,एकनाथ शिंदे, स्वप्निल डवणे, मतीन देशमुख,भागवत जंजाळ,फाईम पठाण,राहुल बडक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

चौकट

बुधवार ( दि.6 ) रोजी शेकडो युवकांनी या समस्ये बाबत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची भेट घेतली त्यानंतर नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी तहसीलदार संतोष गोरड यांची भेट घेवून सदरील विषयांचे गांभीर्य लक्षात घेवून त्वरित शासनाला याबाबत कळवावे अशी विंनती केली.

--–------------------------

देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात क्राईम कॅपिटल वाढत असताना पोलिसांची रिक्त पदे व वाढीव पदे भरणे गरजेचे आहे. देश सेवेसाठी युवक संघर्ष करीत आहेत मात्र या बाबत सरकार सकारात्मक निर्णय घेत नसल्याने सुशिक्षित तरुणांच्या अपेक्षेला तडा जात आहे. स्पर्धा परीक्षेचे शुल्क ग्रामीण भागातील युवकांना भरणे कठीण जाते. हे शुल्क परत मिळत नसल्याने पुनः परीक्षा द्यायची असेल तर या युवकांना किती अडचणी येतात याचा विचार सरकारने केला पाहिजे.
  नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें