मयताच्या जागेचा ग्रामपंचायतने परस्पर केला फेरफार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 फ़रवरी 2018

मयताच्या जागेचा ग्रामपंचायतने परस्पर केला फेरफार.

मयताच्या जागेचा ग्रामपंचायतने परस्पर केला फेरफार. 

समशेर खान.
◆साळेगाव येथील प्रकार
सेलु(प्रतिनिधि):तालुक्यातील साळेगाव येथील ग्रामपंचायतने संगनमत करुन  मयत व्यक्तीच्या नावावर असलेल्या जागेचा वारसांच्या परस्पर फेरफार करुन जागा दुस-यांच्या नावे केल्याचा प्रताप केला असल्याने खळबळ उडाली आहे.
                 साळेगाव येथील ग्राम पंचायत व ग्रामसेवक यांनी संगनमत करुन मालमत्ता क्र. 48 चा परस्पर फेरफार केला आहे. मालमत्ता क्र. 48 ही अंबादास /भानुदास आकात यांच्या समायिक नावे होती. परंतु सदर दोन्ही व्यक्ती या मयत असल्यामुळे सदरिल मालमत्ता दोघांच्या पत्नीच्या नावे वारसा हक्काने घेणे अपेक्षीत होते. परंतु ग्रामसेवक व ग्राम पंचायत ने सदरिल जागेचा वारसा हक्काने फेरफार केवळ अंबादास आकात यांच्या दोन मुलांच्या नावे केला जे की चुकीचे आहे. व त्यानंतर या जागेचा फेरफार परस्पर तिस-या व्यक्तीच्या नावे केल्याचा प्रकार ग्राम पंचायत ने केला असुन ही अत्यंत चुकीची बाब आहे.सदरिल जागा ग्रामपंचायत ने चुकीच्या पद्धतीने फेरफार करुन दुसरे वाटणीदार भानुदास आकात यांच्या वारसांच्या नावे न करता तसेच अंबादास आकात यांच्या पत्नीच्या नावे न करता केवळ दोन मुलांच्या नावे फेरफार केला आहे. तसेच ग्रामपंचायतने मासिक सभेचे प्रोसिडिंग बुक वर पेजिंग करणे तसेच रजिस्टर प्रमाणित केले नाही. जे कि प्रमाणित करणे, गरजेचे आहे. तसेच विविध वेगवेगळ्या तारखांना मालमत्ता क्र. 48 चा नमुना न.8 हा वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावे नकला दिल्या आहेत. तसेच सदरिल मालमत्ता ही प्रत्यक्ष 26.04 *39.07 फुट एवढीच असतांना मात्र नमुना नं. 8 वर 40*30 फुट अशी चुकीच्या पद्धतीने देण्यात आला आहे. तसेच नमुना न. 8 रजिस्टरवर खाडाखोडी करण्यात आलेल्या आहेत .व ही मालमत्ता सदरिल तिस-या व्यक्तीच्या नावे फेरफार करण्याचा घाट केला असल्याने कुटंबातील इतर व्यक्तींनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार सदरिल मालमत्तेचा प्रत्यक्ष जायमोक्यावर जावुन मोजमाप करुन पंचनामा करण्यात आला आहे.
◆नोंदी चुकीच्या
साळेगाव येथील मयताच्या जागेचा फेरफार केलेला हा प्रकार चुकीचा व गंभिर स्वरूपाचा असुन यामध्ये विस्तार अधिकारी पि. एन. शिंदे यांनी प्रत्यक्ष जायमोक्यावर जावुन सदरिल मालमत्तेची मोजणी केली असता सदरील जागा हि पुर्व /पश्चिम26.04 फुट व दक्षिण उत्तर 39.07 फुट एवढी असतांना मात्र नमुना नं. 8 देतांना सदरिल जागा पु/पश्चिम 40 फुट व दक्षिण /उत्तर 30 फुट असल्याच्या नकला ग्रामपंचायतने दिल्या आहेत .तसेच  मासिक सभा प्रोसिडिंग बुक वर पेजिंग व रजिस्टर प्रमाणित केले नाही तसेच मालमत्ता धारक मयत असल्याने दोघांच्या पत्नीच्या नावाने वरसांने नोंद घेणे आवश्यक असतांना तसे करण्यात आले नसुन चुकीच्या पद्धतीने वारसांची नोंद घेण्यात आली आहे. तसेच तिस-या व्यक्तीच्या नावे मालमत्ता करण्याच्या रजिस्ट्री नामंतर च्या अर्जास स्थगिती देण्यात आल्याचे शे-यामध्ये लिहिलेले आहे. तसेच मयत भानुदास बाबूराव आकात यांचा हिस्सा सदर मालमत्तेतुन वरचेवर वगळण्यात आला असल्याचा चौकशी अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें