कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 6 फ़रवरी 2018

कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ

कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ 


समशेर खान.
सेलू :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ येथील नुतन महाविद्यालयाच्या मैदानावर दि. 6 फेब्रुवारी रोजी  आ.विजयराव भांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, जि. प. अर्थसभापती अशोकराव काकडे, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. संजय रोडगे, नुतन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. शरद कुलकर्णी, विनायक पावडे,  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालूकाध्यक्ष वसंतराव बोराडे, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, बजरंग आरकुले, महेश मुसळे, शशांक टाके, कृष्णा रोडगे, अक्षय जवकर, राहूल शेरे, आदी उपस्थित होते.
चार दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सव मंडप पुर्णपणे वाटरप्रुफ असुन सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण मैदानात पत्राची संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. प्रदर्शनाची संभाव्य गर्दी लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.



स्वागताध्यक्षपदी आ.विजयराव भांबळे

सेलूतील बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या स्वागताध्यक्षपदी सेलू - जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आ. विजय भांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच दि. 6 फेब्रुवारी रोजी येथील शासकीय विश्रामगृहात प्रशासकीय अधिका-यांची बैठक आ.विजयराव भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शासकीय यंत्रणांना सक्रिय सहभागी होण्याच्या सुचना यावेळी आ.भांबळे यांनी दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें