विलेपार्ल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा.
*विलेपार्ल्यात एका १५ वर्षांच्या मुलीवर नऊ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हिडीओ क्लीपच्या आधारे ब्लॅकमेल करून अत्याचार करणार्या नराधमांविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून यात भाजप युवा मोर्चाच्या स्थानिक पदाधिकार्याचा समावेश आहे. विलेपार्ले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीत शिकणारी ही अल्पवयीन मुलगी तिच्याच परिसरात राहणाऱया एका तरुणाच्या घरी अभ्यास करण्यासाठी जायची. यादरम्यान घरी कोणी नसताना या तरुणाने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्या नकळत व्हिडीओ क्लिप बनवली. याच व्हिडीओ क्लीपने ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. तिचा हा मित्रा एवढ्यावरच थांबला नाही तर लैंगिक अत्याचार करतानाची ही क्लीप आपल्या मित्रांना पाठवली. एकाकडून दुसर्याकडे अशी नऊ जणांपर्यंत ही क्लीप पसरली. याच आधारे सर्वजण या मुलीला ब्लॅकमेल करू लागले. लैंगिक संबंध न ठेवल्यास क्लिप वायरल करायची धमकी देऊ लागले. त्यामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली. याचाच गैरफायदा घेत नऊ जणांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मानसिक धक्का बसलेली ही मुलगी वारंवारच्या लैंगिक अत्याचारमुळे आजारी पडू लागली. अखेर खोदून खोदून विचारल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आईला सांगितला. आईने विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. याप्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून तीन अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अनिल पुंभारे यांनी दिली. अटक आरोपींना न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.**सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एक नराधम हा भाजप युवा मोर्चाचा विलेपार्ले येथील पदाधिकारी आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करताना तसेच त्यानंतर कारवाई दरम्यान पोलिसांवर प्रचंड दबाव टाकला जात होता. मात्र या दबावाला न जुमानात पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तत्काळ अटकेची कारवाई सुरू केली.*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें