शिवसेनेच्या वतिने सेलु व जिंतुर तालुक्यातील पिकाचे पंचनामे करण्याची मागणी.
समशेर खान.प्रतिनिधी.सेलु.
*परभणी जिल्ह्यामध्ये सेलु व जिंतुर तालुक्यात रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी बर्याच ठिकाणी अवकाळी पाऊस व जोरदार गारपीट झाली याबद्दल पिंकाचे पहाणी करुन पंचनामे करावेत याबद्दल सेलु येथे उपजिल्हाधिकारी यांना शिवसेनेकडुन निवेदन देण्यात आले*
*परभणी जिल्ह्यामध्ये सेलु व जिंतुर तालुक्यात रविवार दि. 11 फेब्रुवारी रोजी बर्याच ठीकाणी अवकाळी पाऊस व जोरदार गारपीट झाली. महसुल व कृषीविभागाच्या संयुक्त पथका मार्फत सर्वक्शण करुन ज्या ठिकाणी रब्बी पिंकाचे नुकसान झाले त्या पिंकाचे तात्काळ पंचनामे करुन शासनास सादर करावेत. दोन्ही तालुक्यामध्ये बहुतांशी गावामध्ये जोरदार वादळी पाऊस व प्रचंड गारपीटीमुळे रब्बी पिंकाचे व फळबागांचे नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने गहु, ज्वारी, हरभरा, बाजरी व मोसंबीच्या बागाचा समावेश आहे.*
*या आगोदरच शेतकरी कापसावर पडलेल्या बोंडअळी मुळे ञस्त होता, त्यामध्ये रब्बी पिंकाचा जिवापाड जपलेला व तोंडाशी आलेला घास क्शाणार्धात नाहीसा होऊन भुईसपाट झालेला आहे. यामुळे शेतकरी पुर्णपणे खचुन गेलेला आहे. म्हणुन तात्काळ संबधीतांना आदेश देऊन पंचनामे करावेत व हेक्टरी 50,000/- रुपये ची आर्थीक मदत ताबडतोब शेतकर्यांना देण्यात यावी.*
*या बाबतचे निवेदन देताना सेलु-जिंतुर विधानसभाप्रमुख तथा जि. प. गटनेते श्री. राम नाना पाटील शिवसेना ता. प्र. रणजित गजमल, रमेश डख,प. स. सदस्य सुधाकर पवार, प. स. सदस्य गोपाळ कदम,चक्रधर पाैळ,जिजाभाऊ सोळंके, रामेश्वर बहीरट, छञगुण मगर, शेषेराव वाघमोडे, काशिनाथ घुमरे, लिंबाजी कलाल, विठ्ठल काळे, अतुल डख, सुशांत मोगल, गुलाब खेडेकर, अरुण ताठे, जिवन चव्हाण, कैलाश वैरागर, बाबा भाबट, सिद्धेश्वर मगर, भगवान डख, माऊली बुधवंत, रामा डख, कोंडीभाऊ जाधव, संतोष घुमरे, विठ्ठल जाधव, व ईतर..*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें