राज्य सिनियर टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत परभणी, मुंबई शहर, सोलापूर, उपनगर मुंबई उपांत्य फेरीत दाखल
सोलापूर (समशेर खान ) टेनिस व्हाँलीबाँल महाराष्ट्र असोसिएशन व सोलापूर शहर टेनिस व्हाँलीबाँल असोसिएशन च्या वतीने आयोजित 19 वी राज्य टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धेत दि. 11 रोजी सांय ,प्रसिद्ध उद्योजक महेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी टेनिस व्हाँलीबाँल जनक डॉ. व्यंकटेश वांगवांड, तर प्रमुख उपस्थितीत शा.शि.शि संघटना राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, राज्य सचिव आंनद खरे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार देशंपांडे, राज्य सहसचिव गणेश माळवे, जिल्हा अध्यक्ष कार्तिक चव्हाण, सचिव संतोष खेंडे , रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
दि. 12 फेब्रुवारी रोजी उपांत्य फेरीत परभणी, मुंबई शहर, सोलापूर , उपनगर मुंबई संघ दाखल झाले.
पुरुष गटात साखळी फेरीत तून बाद फेरीत मुंबई शहर संघाने सांगली संघा चा 2-1 सेट ने पराभव केला, तर परभणी संघाने जळगाव चा 2-1 सेट मध्ये पराभव केला. सोलापूर जिल्हा संघाने लातूर संघाचा 2-1 सेट मध्ये पराभव केला, उपनगर मुंबई संघा ने 2-0 सेट मध्ये सोलापूर शहर संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत दाखल झाले,
महिला गटात उपांत्य फेरीत नाशिक, उपनगर मुंबई व सांगली ,सोलापूर जिल्हा संघ दाखल झाले.
स्पर्धा पंचप्रमुख प्रफुल्ल बन्सोड, डॉ. दशरथ देसिंगे, गजानन शिंदे, गणेश पाटील, किरण घोलप, स्वाती बेने, गणेश कंलगुणे यांनी काम पाहत आहेत.
+-19 वी राज्य सिनिअर टेनिस व्हाँलीबाँल स्पर्धा सोलापूर येथे उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक महेंद्र भोसले, टेनिस व्हाँलीबाँल जनक डॉ. व्यंकटेश वांगवांड, शा.शि.शि. राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, राज्य सचिव आनंद खरे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार देशंपांडे, राज्य सहसचिव गणेश माळवे, जिल्हा अध्यक्ष कार्तिक चव्हाण, जिल्हा सचिव संतोष खेंडे, संभाजी चव्हाण*

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें