ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन(ए.आई.एम.आई.एम)तालुका सिल्लोड पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्या कडे निवेदन द्वारे तक्रार करण्यात आली
सिल्लोड प्रतिनिधी ( शेख कलीम)सिल्लोड तालुक्यात (ए.आई.एम.आई.एम) पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले व
निवेदनात नमूद करण्यात आले अहि कि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य भरात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला होता या कार्यक्रमानुसार ज्या युवकांचे व युवतींचे वय एक जानेवारी २०१८ रोजी अठरा वर्ष पूर्ण होत आहे अश्या सर्व युवकांनी व युवतींनी या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात फार्म न.६ भरून घ्यावे व आपले नाव मतदार यादी मध्ये मतदार म्हणून समाविष्ट करून घ्यावे असे आयोगा कडून आव्हान करण्यात आले होते तसेच ज्या मतदारांचे पूर्वी मतदार यादीत आहेत परंतु पत्ता बदलला किवा ठिकाण बदलला असेल किंवा एखाद्या मतदाराच्या नावात काही चूक झाली असेल अश्या मतदारांना फार्म न.८ अ फार्म न.७ फार्म न.८ असे फार्म भरून देण्याची संधी देण्यात आली होती सदर कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी म्हणजेच १०४ सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी मान्य तहसीलदार तथा सहय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय सिल्लोड यांच्या कडे देण्यात आली होती या कार्यक्रमानुसार १०४ सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये विविध प्रकार चे फार्म अनेक मतदारांनी सादर केले आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात नव मतदार ज्यांचे वय एक जानेवारी २०१८ रोजी अठरा वर्ष पूर्ण होत आहे अश्या मतदारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे ज्यांनी फार्म न. ६ भरून बी.एल.ओ.तहीसील कार्यालय सिल्लोड येथे भरून देऊन प्रथम मतदार होण्याचे स्वप्न पाहिले आहे.१०४ सिल्लोड सोयगाव मतदार संघात कमीत कमी सहा हजार नव मतदारांनी फार्म न. ६ भरून दिले आहे तसेच इतर मतदारांनी सुद्धा विविध प्रकारचे फार्म भरून दिलेले आहे फार्म भरून देण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७ होती यादी प्रसिद्धी ची तारीख ५ जानेवारी २०१८ होती परंतु निवडणुक आयोगाने मतदार यादी १०/१/२०१८ रोजी प्रसिद्ध केली आहे ज्या लोकांनी फार्म न. ६ भरले होते त्यांनी १०/१/२०१८ रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी आपले नाव मतदार यादीत आले असेल या आनंदाने प्रसिद्ध झालेली यादीची पाहणी केली तेव्हा ज्या नव मतदारांनी हजारो फार्म न. ६ भरून दिले होते त्यांचे एक हि नव मतदारांचे नाव या प्रसिद्ध यादीत झालेली दिसून आलेली नाही
दिनांक २५ जानेवारी २०१८ हा दिवस आयोगाने मतदार दिन म्हणून साजरा केला आहे तसेच महाराष्ट्र राज्य ने फेबुरवारी महिन्यात लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात आला आहे हा सर्व आयोग कडून खटाटोप कशासाठी तर म्हणे भारत देशात एकही सज्ञान नागरिक मतदानापासून वंचित राहू नयेत असे आहे परंतु या कार्यक्रमाची जबाबदारी ज्या अधिकारी व कर्मचारी यांच्या कडे दिलेले आहे त्यांचा बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे १०४ सिल्लोड सोयगाव मतदार संघातील हजारो नव मतदार आपल्या मतदानाच्या हक्क अधिकारापासून वंचित राहत आहे या प्रकरणाची चौकशी होऊन सर्व नव मतदाराची नावे १०/१/२०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत मतदार म्हणून समाविष्ट करून घ्यावे अशी निवेदन द्वारे करण्यात आली आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष बनेखा पठाण तालुका उप अध्यक्ष साहेब खा पठाण तालुका युवा अध्यक्ष अन्वर खा पठाण युवा अध्यक्ष फहीम पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें