बळीराजा कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी एक टनाचा बैल खास आर्कषण ; सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 15 फ़रवरी 2018

बळीराजा कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी एक टनाचा बैल खास आर्कषण ; सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल

बळीराजा कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी 

एक टनाचा बैल खास आर्कषण ; सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल 


सेलू :- मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे.
येथील नुतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण शहर भगव्या ध्वजांनी शिवमय झाले असुन स्वागत कमानी उभारणीचे काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे. दि. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष तथा जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आ. विजय भांबळे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती अशोकनाना काकडे यांची उपस्थिती होती.
दि 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आ. बच्चु कडु यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू उपस्थित राहणार आहेत. 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता  पुणे येथील लावण्यविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली.चार दिवसीय या प्रदर्शनात सकाळच्या सत्रात शेतीविषयक तज्ञांचे मार्गदर्शन होणार असुन सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल रहाणार आहे. यात कोल्हापूर येथील शाहिरी कार्यक्रम तर औरंगाबादेतील लोककलेचा कार्यक्रम आर्कषण ठरणार आहे. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालूकाध्यक्ष वसंतराव बोराडे, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, बजरंग आरकुले, रणजित चव्हाण, महेश मुसळे, रामेश्वर शेरे, शशांक टाके, कृष्णा रोडगे, अक्षय जवकर, संतोष शिंदे, राहूल शेरे, विशाल गव्हाडे, शिवाजी पांचाळ, शिवाजी पवार, निखिल सोमाणी, शुभम अंभुरे, अर्जुन चव्हाण, निशिकांत रोडगे, शिवाजी मोकाटे, ओंकार लिपणे, अमोल बिडवे, अमोल डासाळकर  आदी परिश्रम घेत आहेत.



एक टनाचा बैल खास आर्कषण 


बळीराजा राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात भारतातील सर्वात मोठा बैल ज्याचे वजन तब्बल एक टन असुन उंची सहा फुट तर लांबी दहा फुट असल्याचे संयोजक छगन शेरे यांनी सांगितले. हा बैल सध्या नागरिकांत चर्चेचा विषय ठरला असुन याचे कुतूहल निर्माण झाले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें