सिल्लोडशहरातील मुख्य चौकावर गतिरोधक टाकण्याची मागणी
एम.आई.एम. पक्षाच्या वतीने मुख्यधिकारी यांना निवेदन
शे.कलिम.( सिल्लोड प्रतिनिधी )
सिल्लोड शहरातील मुख्य चौकात गतिरोधक टाकण्यात यावे अशी मागणी मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन या पक्षाच्या वतीने एका निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
सिल्लोड शहरात नगर परिषदे तर्फे सडक दुरुस्ती चे कार्य सुरु आहे परंतु त्यात एक हि चौकात गतिरोधक टाकण्यात येत नाही त्यामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात अपघात होऊ नये म्हणून शहरातील प्रत्येक चौकात गतिरोधक टाकण्यात यावे अशी मागणी दिनांक १४ रोजी बुधवार तालुका अध्यक्ष बनेखा पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)जिल्हा महासचिव प्रभाकर पारधे,चांदखा पठाण,अन्वर पठाण,साहेब खा पठाण,शमीम रजवी,निसार हजत,मोईन पठाण,सोहेल खान,नाजीम टेलोर,नसीर पटेल,अश्फाक पठाण,हरून लीडर ,मनांन पठाण,शेख समीर,उबेद देशमुख,जाफर खा पठाण,सय्यद अजीम,असेफ खा पठाण,इरफान पठाण,अयाज पठाण,शौकत शाह आदींनी मुख्यधीकारी अशोक कायंदे यांना निवेदन देऊन मागणी केली कि शहरात मुख्य मार्गाचे काम सुरु आहे पण एक हि चौक मध्ये गतिरोधक टाकण्यात येत नाही कारण शहरातील आंबेडकर चौक,संत गाडगे बाबा चौक,महाराणा प्रताप चौक,शहीद भागात सिंग चौक,महावीर चौक,प्रियदर्शनी चौक,अल्लामा इक्बाल चौक,सर सय्यद अहमद चौक,महात्मा फुले चौक,राजे संभाजी चौक,औरंगाबाद नाका व आजाद चौक या ठिकाणी भरपूर हॉटेल,हतःगड्या वाले,तसेच या मार्गाने बरेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणावर रुग्णालय सुद्धा आहे त्यामुळे नागीरीकांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे रस्ता चांगला असला तर वाहन धारक भरधावणे वाहन चालवितात त्यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात घडू शकतो त्यामुळे या ठिकाणी गतीरोधाकाची अत्यंत गरज आहे जेणेकरून अपघात ला ब्रेक लागेल.रस्त्याची दुरुस्ती चे काम पुन्हा सुरु झाल्याने व आपल्या प्रेश्रामास यश प्राप्त झाल्याने शहर अध्यक्ष शेख इम्रान(गुड्डू)व आदी कार्यकर्ते-त्यांनी पटाखे फोडून आनंदउत्सव साजरा केले तसेच रस्त्या चे काम सुरु करण्यात परिश्रम घेतले म्हणून नागरिकांनी त्यांचे आभार मानले..

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें