राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नूतन कन्या प्रशालेस प्रथम क्रमांक
@ कु.समिधा आष्टीकर हीचे यश @
समशेर खान.सेलू / प्रतिनिधी
नरहर कुरुंदकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,कुरुंदा ता.वसमत जि. हिंगोली आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नूतन कन्या प्रशाला सेलूच्या कु.समिधा धनंजय आष्टीकर (इयत्ता १० वी ) हीने प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .
दि.९ फेब्रु .शुक्रवार रोजी कुरुंदा या ठिकाणी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पार पडली .सोशल मिडिया आणि सामाजिक स्वास्थ्य या समर्पक विषयावर तीने विषय मांडणी केली. रोख ५००० रु. ,स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व फिरती ढाल देऊन पाहुण्यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.प्रशालेस सतत दुसऱ्या वर्षी फिरती ढाल प्राप्त होत आहे.
तसेच दि.१० फेब्रु .शनिवार रोजी कुरुंदा याच ठिकाणी राज्यस्तरीय समुहनृत्य स्पर्धा पार पडली यात नूतन कन्या प्रशाला सेलू च्या संघास उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. या संघात आरती अंभुरे ,रोशनी राठोड ,रक्षा जैन ,गीता प्रधान ,वंशिता कुलकर्णी ,अंकिता शिंदे ,मेघना हिंगे ,प्रतीक्षा अंभोरे ,ऋतुजा पवार यांचा समावेश होता.
या यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील हेमलता देशमुख ,कीर्ती राऊत ,श्रीकांत नेवरेकर ,नागेश देशमुख ,विजया खडके यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वितांचे नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस . एम . लोया , उपाध्यक्ष वसंतरावजी खारकर ,सचिव डी. के.देशपांडे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी ,डॉ. व्ही. के. कोठेकर ,शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती ,दत्तरावजी पावडे ,मुख्याध्यापिका शोभा चाटे ,उपमुख्याध्यापक सुरेश रणखांबे ,पर्यवेक्षक अशोक वानरे तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें