जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर डाॅ. विलास मोरे यांची निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 फ़रवरी 2018

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर डाॅ. विलास मोरे यांची निवड

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर डाॅ. विलास मोरे यांची निवड 

शमशेर खान .
सेलू :- अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून जिल्हयातील ग्राहकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी अविरत काम करणारे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांची महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीचे पदसिध्द सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी काम पाहतात यासह पोलिस अधिक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त, दुर संचार विभागाचे कार्यकारी अभियंता, वैध मापन शास्त्र विभागाचे सहाय्यक निबंधक, जिल्हा कृषी अधिक्षक, जि.प.चे आरोग्य अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी हे या समितीचे पदसिध्द सदस्य आहेत. या समितीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रतिनिधी म्हणून यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूणजी देशपांडे यांनी डाॅ. मोरे यांच्या नावाची शिफारश केली होती. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ही निवड घोषित केली आहे. या समितीवर कार्य करणार्‍या सदस्यांनी शासनाचे निर्णय व शासनाकडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या सुचनानुसार काम पाहणे अपेक्षित आहे. जिल्हयातील ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करतानाच जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या कार्यालयात दर महिन्यास होणार्‍या बैठकांनाही या सदस्यांना उपस्थित रहावे लागते. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर निवड झाल्याबद्दल डाॅ. विलास मोरे यांचे अ.भा. ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते याच्याकडून अभिनंदन केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें