सोनपेठ येथे बारावीच्या परीक्षेस सरूवात
सोनपेठ तालूक्यातून यंदा ६७० विद्यार्थी देत आहेत परीक्षा
सोनपेठ(राजेश खेडकर)एच.एस.सी. (बारावी) परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०१८ला आज (दि.२१ फेब्रुवारी) पासुन सुरूवात झाली असुन. सोनपेठ तालूक्यातील श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावरून कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी. शाखेतील एकंदर ३८३ विद्यार्थी व महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय ऊखळी येथून २८७ विद्यार्थी परीक्षेस सामोरे जात आहेत. परीक्षेस शांततेत व सुरळीत सुरुवात झाली असुन; परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात संपन्न व्हाव्यात यासाठी प्रशासनही विशेष दक्ष आहे. यासाठी भरारी पथक व बैठेपथक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण यांनी दिली आहे. यात ऊखळी केंद्रावर केंद्र संचालक म्हणुन प्रा.राठोड, बैठे पथक प्रमुख सुरनर, दोन पुरूष व महिलांची तर सोनपेठ केंद्रावर केंद्र संचालक म्हणुन प्रा.गोविंद लहाने, बैठे पथक प्रमुख कोटलवार, दोन महिला व तीन पुरूष कर्मचारी नियुक्त केल्याचेही शौकत पठाण यांनी सांगीतले. तसेच परीक्षा केंद्रावर व केंद्रा बाहेर कोनताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी सोनपेठ पोलीसांकडुनही कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचे पो.नि.सोपान सिरसाठ यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें