मोटारसायकल-ट्रकचा भीषण अपघात ● दोन ठार, एक गंभीर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 22 फ़रवरी 2018

मोटारसायकल-ट्रकचा भीषण अपघात ● दोन ठार, एक गंभीर

मोटारसायकल-ट्रकचा भीषण अपघात ● दोन ठार, एक गंभीर

शे.सलिम.
भोकरदन. (प्रतिनिधी)
        ताडेगाव वाडी येथून तिन विध्यार्थी भोकरदनला मोटारसायकलने जात असताना जालना रोडवरील तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कुंभारी फाट्या दरम्यान मोटारसायकल-ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमींपैकी एकाची औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच प्राणज्योत मावळली.
      आज पासून १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या असून करण काळूसिंग सुंदरडे व अनिल केसरसिंग घुनावत हे दोघे बारावीचा पेपर देण्यासाठी तर सुनील रुपसिंग घुनावत हा सेकंड इयरला असून तो मोरेश्वर कॉलेज मधून परीक्षेचे हॉल तिकीट आणण्यासाठी असे तिघे मोटारसायकलने ताडेगाव वरून भोकरदनला येत होते.यावेळी भोकरदन जवळच तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कुंभारी फाट्याच्या दरम्यान त्यांच्या  मोटारसायकल क्र.(एम.एच.२१ एके ९३९२) आणि जालण्याकडे जाणार ट्रक क्र. (जीजे १८ एएक्स ९१७७ ) सोबत भीषण अपघात झाला. या अपघातात सुनील रुपसिंग घुनावत (रा.ताडेगाव वाडी) वय १८ हा जागीच ठार झाला. त्याच्या सोबत असलेल्या अनिल केसरसिंग घुनावत व करण काळूसिंग सुंदरडे वय १८ दोघे रा.ताडेगाव वाडी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ औरंगाबाद ला हलविण्यात आले आहे.परंतु पैकी अनिल केसरसिंग घुनावत याची रस्त्यातच प्राणज्योत मावळली. सुनील आणि अनिल हे दोघे चुलत भाऊ असून दोघेही कुटुंबात एकुलते एक होते.सुनील हा औरंगाबाद येथे राहतो.तो परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यासाठी गावाकडे आला होता. दरम्यान गावातील दोन तरुणांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें