माणूसकीचा झरा चिरंतन जपणाऱ्या सेलूच्या गस्तीवरील पोलीस कर्मचार्यांचा सत्कार
प्रसववेदना सोसणार्या महिलेला दिला मदतीचा हातसेलू
दि. ७/२/२०१८
सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात माणूसकी लोप पावत चालली आहे अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला घडत असतात.या भाऊगर्दीतही सदरक्षणाय खलनिग्रहनाय हा मूलमंत्र मनाशी घट्ट रुजवून सामान्य जनतेच्या हाकेला धावून येतात ते पोलीस.
असेच रात्रीच्या गस्तीवरील दोन पोलिस कर्मचारी गोपाळ रासवे व संजय चव्हाण यांनी माणूसकीचा झरा चिरंतन जपत प्रसववेदनेने त्रस्त नंदिनी शिंदे यांना वेळीच दवाखान्यात दाखल करून माणूसकीचे दर्शन घडवले.
मध्यरात्री २ ची वेळ सर्व लोक शांत निद्रेत असताना अचानक सेलू शहरातील विद्यानगर भागात नंदिनी शिंदे यांचा जीव प्रसव वेदनेने व्याकूळ झाला. अशा वेळी गरज असते ती एखाद्या रिक्षासारख्या वाहनाची पण तोही इतक्या रात्री च्या वेळी मिळणे दुरापास्त होते.बरे १०८ क्रमांकावर काॅल करून रूग्नवाहिका बोलवावी तर त्यालाही कोणी सापडेना.
अशा या जीवाला पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगी मदतीचा हात देत धाऊन आले ते रात्री च्या गस्ती वरील दोन पोलीस कर्मचारी गोपाळ रासवे व संजय चव्हाण हे दोन पोलीसमामा.यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गस्ती वरील गाडीत नेऊन खाजगी रूग्णालयात दाखल केले व थोड्याच वेळात नंदिनी ताई यांनी एका गोंडस बालकाला जन्म दिला.
या कौतुकास्पद कार्याबद्दल या दोन्ही पोलीस कर्मचार्यांचा सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते सतिश जाधव,लक्ष्मण केदासे, आबासाहेब लोंढे,सुनील गायकवाड, राजेंद्र पाटोळे, आश्विन केदासे,जाधव यांनी सत्कार केला.
यावेळी सेलूचे पी.आय डि.के.चौरे,यु.के लाड,शेख बारी,रंजीत आगळे यांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें