चिन्मय चे वार्षिक स्नेहसम्मेलण उत्साहात साजरे - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 फ़रवरी 2018

चिन्मय चे वार्षिक स्नेहसम्मेलण उत्साहात साजरे

चिन्मय चे वार्षिक स्नेहसम्मेलण उत्साहात साजरे

समशेर खान.
प्रतिनिधी.सेलू
    स्वाभिमान सेवाभावी संस्थे 'अंतर्गत' चिन्मय कोचिंग क्लासेस चे अंतरंग वार्षिक स्नेहसम्मेलण गणेश नगर येथे उत्साहात साजरे झाले.यावेळी प्रमुख पाहुणे श्री.राहुल कर्डीले (सहाय्यक जिल्हाधिकारी) हे होते.ते म्हणाले"विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची माहिती घ्यावी.स्पर्धापरीक्षेत यश मिळवण्यासाठी जिद्द,चिकाटी,मेहनत लागते जी तुमच्यात आहे.तुम्हाला गरज आहे मार्गदर्शनाची जी चिन्मय मधून पूर्ण होईल.तुम्हा सर्वाना यशस्वी होण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा"
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री महेश कुलकर्णी यांनी केले.ते म्हणाले"पालकांनी मुलांवर दबाव आणू नये त्यांची तुलना इतर मुलासोबत करू नये.*देशासमोरील सगळ्या समस्यांचे मूळ अशिक्षित पणा आहे*मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी प्रयत्न करावेत" तसेच चिन्मय च्या विविध यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती त्यांनी दिली.
        यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती श्रीकांत वाकडीकर(विमा प्रतिनिधी) यांची होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत वाईकर(विधिज ) हे होते त्यांनी सर्व यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन केले.
पाहुण्याच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. त्यात कलाश्री श्रिया गोसावी,क्रीडाश्री प्रणव अवचार तर यशश्री सुमीत कुलकर्णी यांना विशेष पारितोषिक देण्यात आले.
 यावेळी 2017-2018 चा शैक्षणिक अहवाल मृणाल कुलकर्णी हिने वाचला.त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात शंभुसूताय,झुंजू मंजू पहाट झाली,सुरू झालिया पेरनं,काठी न   घोंगडं घेऊ द्या किरं आणि एक मोबाईल वेड या लघु नाटकांनी साऱ्याची मने जिकलीं
यावेळी इंग्रजीतून सूत्रसंचालन प्रतीक्षा केंद्रे,वरद बरकुले, तृप्ती धरणे,उन्नती घुगे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ पतंगे,आकांक्षा ढगे, श्रीराम लाटे,शिवानी सुरवसे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार श्याम राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौरभ अवतारे, सौ काकडे,सौ नीतनवरे,धापसे, विशाल जाधव,अंकित भोकरे,कैलास बरसाले,भानुसे,गात ,अमोल मरकट, रेणुका खिस्ते ,गोरे यांनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें