वालुर प्रा.आरोग्य केंद्रात सुविधाचा आभाव औषध साठा उपलब्ध नसल्याने नागरीकांची गैर सोय. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 फ़रवरी 2018

वालुर प्रा.आरोग्य केंद्रात सुविधाचा आभाव औषध साठा उपलब्ध नसल्याने नागरीकांची गैर सोय.

वालुर प्रा.आरोग्य केंद्रात सुविधाचा आभाव औषध साठा उपलब्ध नसल्याने नागरीकांची गैर सोय.

+रुग्नवाहिका झालि गायब,रुग्नाना पिण्यासाठि पाणी सुविधा उपलब्ध नाहि,

+टेबल असुन हि नियोजन शुन्य कारभाराने रुग्नाना खालि बसुन डाँक्टरचि प्रतिक्षा करावी लागते,


अनवर पठान,वालुर
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र वालुर  येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना उपचाराऐवजी निराश होऊन परतावे लागत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र वालुर येथील  आरोग्य यंत्रणा औषधीअभावी व रुग्नवाहिके अभावी जनतेसाठी शाप ठरत आहे. सर्वसामान्यासह मजूर व शेतकरी वर्ग आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी रुग्णालयात उपचार करु शकत नाही. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, येथे उपचार होत नाही.
मागील अनेक दिवसापासून आरोग्य केंद्रात औषधीचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण विभागात जास्त रुग्ण येत असतात. परंतु या आरोग्य केंद्रात सुविधाचा अभाव असल्याने विविध समस्या भेडसावत आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असून रुग्ण कल्याण समिती केवळ नावापूर्तीच आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्याकडे लक्ष देणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पदाधीकारी व अधिकाऱ्यांच्या गैरसोयीमुळे व ते सर्व बाहेरगावाहुन अपडाऊन करीत असल्याने रुग्णाची अवस्था अडकीत्यातील सुपारीसारखी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र वालुर येथे पिण्याच्या पाणीची सुविधा नाहि व त्यास प्रमाणे येथील रुग्नवाहिका हि बरेच दिवसाने गायब आहे.रुग्न उपचारासाठि आले तर त्यांना बसायला टेबल वगेरे नसल्याले परेशानि होत आहे.या बाबीने नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांना नेहमीच सामोरे जावे लागते. आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी खासगी उपचार करु शकत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीसाठा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
त्यामुळे आरोग्य किंवा इतर विभागाचे अधिकारी येथे फिरकून पाहत नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देण्याची मागनी परिसरातील नागरिक करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें