हदगाव बु.ता.पाथरी येथील घरकुल वाटपात झाला घोटाळा.
+जि.प.उपाध्यक्ष व शिक्षण सभापती यांच्या गावातील गैर प्रकार.
संपादक(अनवर पठान)
देशातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठिच्या अनुषंगाने केंद्र सरकारने जुन 2015 मध्ये सर्वासाठि घरे या संकल्पनेवर आधारीत "प्रधानमंत्री आवास योजना" सुरु केलेली असुन याची काटेकोर पने अमंलबजावनी होणे गरजेचे असताना काहि ठिकानी लाभार्थींना या योजनेचे लाभ मिळत नाहि व या लाभापासुन लाभार्थी वंचित राहत आहे.
असेच एक प्रकार हदगाव बु.ता.पाथरी जि.परभणी येथे घडले आहे या ठिकानी चक्क लाभार्थीना पक्के घर व शेत आहे असे अहवालात पं.स अधिकारी यांनी नमुद केले आहे.
सविस्तर वृत असे कि हदगाव बु.येथील शे.करीम शे.ताज मोहम्मद यांचे नाव घरकुल योजनेत मंजुर झाले होते परंतु पंचायत समितीचे NRN विभाग प्रमुख श्री.ए.टि.गोकणवार यांनी खोटि व चुकिची माहिती देऊन संबधित लाभार्थीचे नाव या यादितुन वगळल्याची तक्रार गटविकास अधिकारी पं.स.पाथरी यांना एका लेखी निवेद्नादवारे 31/01/2018 रोजी शे.करीम शे.ताज मोहम्मद यांनी केलेली आहे.परंतु या प्रकरणी अाध्याप तिळमात्र हि कार्यवाहि झालेली नाहि.
विशेष म्हणजे विद्यमान जि.प.उपाध्यक्षा व शिक्षन सभापती यांचे हे गाव असुन या गावात अधिकारी असे गैर प्रकार करत असतील तर पुर्ण जिल्ह्याचे हाल काय असतील असा प्रशन निर्मान झालेला आहे.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें