डाॅ.सा.द.सोनसळे यांची स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळावर निवड
सोनपेठ(राजेश खेडकर)येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयातील मराठी विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापक डाॅ.सा.द.सोनसळे यांची स्वा. रा.ती.म.विद्यापीठ नांदेड च्या मराठी अभ्यास मंडळावर कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी म्हणून नुकतीच निवड झाली आहे. म्हणून महाविद्यालयाकडून त्यांचा सत्कार प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते याच्या हस्ते करण्यात आला.
डाॅ.सा.द.सोनसळे यांनी गंगाधर पानतावणे यांच्या मार्गदर्शनात एम.फिल.पदवी प्राप्त केली असून पिएच.डी.पदवी डाॅ.नागनाथ कोतापल्ले यांच्या मार्गदर्शनात संपादन केली आहे. आतापर्यंत त्यांची सात पुस्तके प्रकाशित अाहेत. पैकी "घुसमट" या इसाप प्रकाशन नांदेड कडून प्रकाशित तीन अंकी नाटकास महाराष्ट्र शासनाच्या रा.ग.गडकरी ऊत्कृष्ट वाड.मय निर्मिती पुरस्काराने २००४साली गौरविले आहे. याचबरोबर 'बुध्द तत्वज्ञान:प्रचार आणि प्रसार' या सुमेध प्रकाशन पुणेकडून २००६ साली प्रकाशित पुस्तकास महू(म.प्र.) येथून बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व संशोधक मार्गदर्शक म्हणून ते आज मराठी विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात सात विद्यार्थ्यांनी पीएच.डी.ही पदवी प्राप्त केली आहे.
त्यांच्या या ऊत्तुंग कामगिरीचा गौरव करत मा.कुलगुरू डाॅ.पंडित विद्यासागर यांनी त्यांची मराठी अभ्यास मंडळावर केलेली ही सार्थ निवड असल्याचे यावेळी अभिनंदनपर बोलतांना सांगीतले. या वेळी सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी डाॅ.सोनसळे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें