शिक्षण आणि रोजगार विषयक धोरण चुकीचे : सुनिल धन्वा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 9 फ़रवरी 2018

शिक्षण आणि रोजगार विषयक धोरण चुकीचे : सुनिल धन्वा

शिक्षण आणि रोजगार विषयक धोरण चुकीचे : सुनिल धन्वा

सोनपेठ(राजेश खेडकर)
डेमॉक्रटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ( डि. वाय. एफ. आय.)  व स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडिया ( एस. एफ. आय.)  च्यावतीने जागर जत्था सोनपेठ येथे दाखल झाला होता. त्यावेळी परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना डी. वाय.एफ.आय. चे राज्यअध्यक्ष सुनिल धन्वा यांनी सरकारची धोरणे चुकीचे असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात बेरोजगार युवकांच्या समस्या मांडण्यासाठी व शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी युवक व विद्यार्थी संघटना डी. वाय. एफ. आय. व एस. एफ. आय. संघटनांच्या वतीने नांदेड ते सोलापूर काढण्यात आलेल्या जत्थ्याचे जंगी स्वागत सोनपेठ शहरात करण्यात आले. विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता व सामान्यांच्या समस्या याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी या जत्थ्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी बोलताना सुनिल धन्वा यांनी सरकारची धोरणे ही रोजगार व शिक्षणाच्या बाबतीत चुकीची असून मागील सरकारने केलेल्या चुकाच पुढे हे सरकार करत आहे. त्याहीपुढे जाऊन हे सरकार राष्ट्रीय एकात्मते बाबत गंभीर नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
जनार्दन काळे, मोहन जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. शाहीर चंद्रकांत मंजुळकर शाहीर विशाल पवार यांच्या संचाने सुंदर चळवळीची गिते गाईली, अँड. अजय बुरांडे, अनिल वासन, अमोल वाघमारे,  सुहास झोडगे आदी कार्यकर्ते जथ्यामध्ये सहभागी होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब यांनी तर आभार शिवाजी कदम यांनी मानले. सोनपेठ शहरातील डी. वाय. एफ. आय. चे कार्यकर्ते व नागरीक गणेश चव्हाण, सुशील सोनवणे, सचिन चव्हाण,  पंडित राठोड, विठ्ठल मुलगीर, एकनाथ गंगणे, अंकुश रसाळ,  दत्ता उंबरे,  उद्धव गांगर्डे,  जावेद शेख, राहुल साठे, विजय राजभोज, अविनाश आगळे, सरांडे,  यांच्यासह अनेक नागरिकांची यावेळी उपस्थित होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें