सेलु येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 16 फ़रवरी 2018

सेलु येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

सेलु येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

        दि.15.2.2018 रोजी सेलू येथे संत सेवालाल महाराज यांची 279 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बी आर राठोड होते.तर प्रमुख मार्गदर्शक श्री.संपतभिया चव्हाण यांनी संत सेवालाल यांचा जीवनपट कथित केला. तसेच सेवालाल महाराजांची शिकवन जानजो -छानजो अन् पचं मानजो अर्थात कोणतेही कार्य करतांना आपल्या सद्सद्विवेकबुद्धिने विचार करावा व नंतर स्वीकारावा.असे ते म्हणाले.कार्यक्रमास न. प. सदस्या सौ.सुनिताताई मारोतराव चव्हाण, एम बी राठोड आदि उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष श्री मारोतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी  झाला.सर्व गोरबांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास योगदान दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें