शिवाजी महाराजांना मानले पण त्यांचे का मानत नाही:सुबहान अली,
*व्याख्याना नंतर हिंदू मुस्लिमांनी घेतली शपथ*
*महाराजांनी कधीच जातीभेद केला नाही*
*हुंडा न घेता करणार लग्न अनेकांनी दिली ग्वाही*
शे.सलिम.(भोकरदन प्रतिनिधी)
शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शहरात सुबहान अली यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम पोलीस ठाणे समोर आयोजित करण्यात आले असुन या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने हिंदु मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर सहभाग घेतला होता विषेश म्हणजे शिवाजी महाराजांना मानले पण त्यांचे का मानत नाही कारण महाराजांनी कधीच जातीभेद केला नाही पण आज समाजात काही समाजकंटकांनी ते करण्यासाठी इतरांना भाग पाडण्याचे ठरवले असल्याचे दिसते खरेतर समाजाला इतिहास वाचावा लागेल कारण कोणाचे बोलण्यावर जावु नका तसेच राजकारण करू नका जर करायचेच असेल तर राष्टमाता जिजाऊ यांच्या सारखे करा शिवाजी महाराज यांच्या सारखे करा असे प्रतिपादन सुभान अली यांनी केले आज इतिहास बदलुन सांगितले जात आहे त्यामुळे समाजात फुट पाडण्यात येत आहे त्यासाठी इतिहास वाचावा लागेल आपल्या आयुष्यात महाराजांनी कधीच अन्याय होऊ दिला नाही तर मंग आपण का मागे राहतात पुढे या आणी महाराजांचे माना असे पुढे बोलतांना सुभान अली म्हणाले आपली विचार धारा बदला कोणाचे बोलण्यावर विश्वास ठेवु नका समाजात तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका विषेश म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगदी जवळ मुस्लिम होते तर त्यांनी कधीच हिंदु मुस्लिम केला नाही तर आपण कसे मावळे आहे जो आज हे सर्व करतात कोणावर अन्याय होत असेल तर पुढकार घेवुन त्याची मदत करा ते कोणता ही समाजाचा असो अरे महाराज यांनी कधीच भेदभाव केला नाही तर आपण कोण दरम्यान कार्यक्रम सुरूवातीला अनेकांच्या मनात एक विचार मनात आला हे मुस्लिम दिसतो याला काय इतिहास माहीत असणार पण सुभान अली यांनी सुरवात केली तर अनेकांना तोंडात बोट टाकले मोहत्वाचे म्हणजे शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण हे त्यांनी इतिहास वाचुन सांगितले हिंदु मुस्लिम दलित धनगर हे भेद भाव सोडा मुस्लिम महाराजांचे कधीच शत्रू नव्हते याची जाणीव पटुन दिली आणी हुंडाबळी विषयवर सखोल मार्गदर्शन केले प्रेषित मुहम्मद पैगंबर सहाब यांनी लग्न सोपे करा इतके सोपे की (जीना) अर्थात बलात्कार बंद पडेल दरम्यान या व्याखानाने अनेक हिंदु मुस्लिम समाजातील समाजबांधवांनी प्रेरणा घेतली तसेच शपथ घेतली की कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही तसेच निराधारांना मदत केली जाणार त्याच बरोबर दहा ते पंधरा हिंदु मुस्लिम तरूणाने लग्नात हुंडा न घेण्याची शपथ घेतली तसे सर्व समोर जाहीर केले विषेश म्हणजे सुभान अली यांनी आज पर्यंत बाराचे व्याख्यान आयोजित केले मोहत्वाचे म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर हिंदु मुस्लिमानी एकमेकांना शुभेच्छा एकते चा संदेश दिला या वेळी माजी नगराध्यक्ष हर्षव कुमार जाधव,नारायण जिवरंग, राहुल देशमुख, विष्णू गाढे, हाजी अफसर सौदी अरेबिया वाले, हाफीज शफी, नुरानीचे ईमाम साहेब,गजानन तांदुळजे,सुरेश तळेकर, गणेश बापु ईगंळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, शब्बीर कुरैशी,नईम कादरी,रमेश जाधव,तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व तसेच मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर हाजर होते,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें