भोकरदन येथे कराटे पटूंना बेल्ट चे वितरण
शे.सलिम.
भोकरदन (प्रतिनिधी )भोकरदन येथे ओ.टी.एस.कराटे ऑर्गनायझेशन इंडिया च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विविध बेल्ट चे वितरण करण्यात आले.भोकरदन येथील कराटे प्रशिक्षक अनिल पगारे (ब्लॅक बेल्ट 4 डॅन) यांनी दि . 7 फेब्रुवारी रोजी रामेश्वर महाविद्यालयाच्या पटांगणावर कराटे बेल्ट ची परिक्षा घेण्यात आली. यावेळी जवळपास 52 कराटे पटूंना विविध बेल्ट प्रदान करण्यात आले. त्यात स्वप्निल सुरेश बनकर (ब्ल्यू बेल्ट ) करण कचरू बोर्डे (यलो बेल्ट ) वनिता तळेकर, दिपक पाथरे, निकिता गोरे, गौरव गाडेकर, करण पाथरे, खुशी बनकर यांच्या सह बावन्न कराटे पटूंना विविध बेल्ट प्रदान करण्यात आले. सदरील वितरण माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पगारे यांच्या हस्ते व माजी केंद्र प्रमुख एस एस. बनकर, माजी विस्तार अधिकारी राणूजी इंगळे, वराडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें