रुस्तम शेख जिल्हा व्यसनमुकत्ती पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी.कळंब तालुका :- कळंब तालुक्यातील कात्री येथील गुरूदेव सेवा मडळाचे कार्यकर्तें तथा राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख हे सक्रीय सामाजिक कार्यकर्ते असुन त्यांनी मुबई सलाम फांउडेशन व गुरूदेव सेवा मंडळ च्या माध्यमातुन.ग्रामीण भागात व्यसनमूक्ती चे कार्य केले आहे .
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यवतमाळ जिल्हा विकास मंच ०दारा आयोजित व्यसनमुक्ती पुरस्कार वितरण समारोह कार्यक्रमात घाटंजी येथे रुस्तम शेख यांना जिल्हा व्यसनमुक्ती पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा विकास मंच चे अध्यक्ष माजी मंत्री मा शिवाजीराव मोघे , माजी आमदार मा अण्णासाहेब पारवेकर , मा संतोष शेळके महाराज (व्यसनमुक्ती सम्राट बुलढाणा ) , मा के डी जाधव उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा विकास मंच , मा प्रकाश जानकार सरचिटणीस यवतमाळ जिल्हा विकास मंच तथा जलतज्ञ जलयुक्त शिवार अभियान इ मान्यवरांच्या हस्ते रूस्तम शेख यांना शाल , स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला
राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला व्यसनमुक्त समाज निर्माण करण्या करीता यापुढे ही सदैव कार्यरत राहील अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी दिली


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें